सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वान दिनी करुणा बुद्ध विहार येथे धम्म शिबीर संपन्न…

महेंद्र हरले

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

वरुड :विश्वरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक दिवशी धम्म शिबिराचे आयोजन.

स्थानिक करुणा बुद्ध विहार वरुड येथे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक दिवशीय धम्म शिबिर घेण्यात आले. शिबिराचे नेतृत्व धम्मचारी श्रद्धाप्रिय अमरावती यांनी केले.या शिबिराचा अनेक धम्ममित्र,सहायक यांनी लाभ घेतला.शिबिराची सुरवात पूजेने झाली.पूजेचे नेतृत्व निर्मलाताई लांडगे व शारदाताई पाटील यांनी केले.ध्यान सराव धम्मचारी कुशलसत्व यांनी घेतला. विधायक वातावरण निर्मिती आयु.मारोतराव धुताले,आयु.नरेश रामटेके यांनी गीत गायन करून केली.बाबासाहेबांच्या विचाराची गरज आधुनिक जगाला आहे.महामानवाचा मृत्यू आपणास काय शिकवून जातो? याचे चिंतन करून आचरण केले पाहिजे असा मोलाचा सल्ला धम्मचारी श्रध्दाप्रिय यांनी दिला. मार्गदर्शकांचा परिचय धम्मचारी श्रद्धादित्य यांनी दिला. या धम्म शिबिरात ध्यान, गटचर्चा, प्रश्नोत्तरे झालीत. धम्ममित्र ज्योती गाडगे,शोभाताई खणखणे,खनखणे साहेब यांनी मनोगते व्यक्त केलीत. शिबिरातील बालमंच दीक्षा खातरकर यांनी तर चहापान व्यवस्था प्रज्ञा मगरे,शिल्पा बागडे यांनी सांभाळली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी धम्मचारिनी अचलसिरी, धम्मचारिनी मैत्रितारा यांनी परिश्रम घेतले. शिबिराचे सूत्रसंचालन धम्ममित्र दर्शना बागडे यांनी केले तर शेवटी आभार धम्ममित्र रवीना अधव यांनी मानलेत. धम्मपालन गाथेने शिबिराची सांगता झाली.


Share
ही बातमी वाचा.  दिवंगत धम्मचारी कृपाकर यांचे कार्य अजरामर राहील-धम्मचारी श्रद्धा राजा( इंग्लंड )

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.