ताज्या घडामोडी

आदिवासी आश्रमशाळेतील वर्ग पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता फक्त पाच शिक्षक असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक भविष्य धोक्यात…

महेंद्र हरले (वरुड)

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

(महेंद्र हरले वरूड प्रतिनिधी)
आदिवासी विकास विभागांतर्गत धारणी प्रकल्प कार्यालयाच्या अधिपत्यात सुरू असलेले वरूड तालुक्यातील माणिकपूर येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा येथे वर्ग पहिली ते दहावी ची निवासी शासकीय आश्रम शाळा आहे.

याठिकाणी जवळपास २८५ विद्यार्थी संख्या असून १६९ मुलांची तर ११६ मुलींची संख्या आहे. आदिवासी विकास विभागाकडून मुलांच्या राहण्यासाठी वसतिगृह भव्य दिव्य इमारत बांधण्यात आले. आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊन आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा याउद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च केल्या जाते.

माणिकपूर आश्रम शाळेच्या विकासासाठी सुध्दा कोट्यवधी रुपये खर्च होत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची स्थिती खरंतर वाऱ्यावर आहे. पहिली ते दहावी पर्यंत वर्ग असताना शाळेत शिकवायला फक्त पाच शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना झोपण्याकरिता स्वच्छ बेड, चादर चांगल्या स्थितीत उपलब्ध नाहीत. शिक्षकांअभावी एका वर्गात एकापेक्षा जास्त वर्गाचे विद्यार्थी बसवून शिकवल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दुर्लक्ष होत आहे. आदिवासी समाजासाठी विकासकामांच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च केल्या जाते परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहात न येता अश्या बेजाबदार व दुर्लक्षितपणामुळे आदिवासी समाज अजूनही मागास राहतो आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल निर्माण झालेला आहे.

यावर  बिरसा क्रांती दल अमरावती चे जिल्हा संघटक ॲड. पवन वाडीवे प्रतिक्रिया देतांना म्हणाले की आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्या जात आहे. परंतु विकास फक्त पायाभूत सुविधांचा करून सुरू आहे तर शैक्षणिक विकास मात्र भकास असल्याचे वास्तव आहे. तसेच संबधित यंत्रणा चालवण्यासाठी लागणारा खर्च ठेकेदारी तसेच वेगवेगळ्या माध्यमातून कमिशन मिळवून आदिवासी विकास विभागाची लूट सुरू आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

ही बातमी वाचा.  नागपूर जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत उमरेड विधानसभा टॉपवर....

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.