देश विदेश

एअर इंडियाचे लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात 200 च्या वरती प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू…

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

गुजरातमधील अहमदाबाद येथील विमानतळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेघानी येथे एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पडलं. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दिल्लीहून अहमदाबादमार्गे इंग्लंडला जात असलेलं हे विमान रहिवाशी भागात पडले असून विमानामधून 52 ब्रिटीश नागरिक प्रवास करत होते.

 

अहमदाबादहून लंडन गॅटविकला दुपारी 1.38 वाजता निघालेले हे विमान, बोईंग 787-8 होते. विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यामधील 2 पायलट आणि 10 क्रू मेम्बर्स होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास, सर्वच्या सर्व  प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान मेघानी नगरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झालं. हे विमान दिल्लीमधून अहमदाबादला पोहोचलं होतं आणि तेथून लंडनला रवाना होणार होतं. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील या विमानात होते.

एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) नुसार, विमानाने रनवे क्रमांक 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यानंतर, विमानाने ताबडतोब एटीसीला मे डेचा संदेश दिला. या संदेशाचा अर्थ असा की विमानात आपत्कालीन परिस्थिती आहे. यानंतर, एटीसीने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.

ही बातमी वाचा.  पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का निधन, दिल्ली एम्स में ली आखिरी सांस

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.