
नागपूर : महाराष्ट्र महिला बचत गट संघटनेने संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी अनुप खांडे यांची भेट घेऊन निवेदन दिले
निवेदनात म्हटले की रमाई महिला बचत गटाच्या रेशन दुकानाला सुरू करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात पुरवठाविभागाला होते,
परंतु पुरवठा विभागाकडून हे दुकान सुरू करण्यासाठी विविध कारण देत टाळाटाळ केली जात आहे,
रमाई महिला बचत गटाला धंतोली झोन मध्ये रेशन दुकान मंजूर झाले परंतु तिथे दुकानासाठी भाड्याने खोली उपलब्ध होत नसल्याने हे दुकान सुभाष नगर वॉर्ड नं. 74 येथे सुरू करण्यासाठी अर्ज केला.
झोनच्या आदेशावरूनच पुरवठा अधिकाऱ्यांनी 17 जानेवारी 2025 रोजी दुकान सुरू करण्याचे आदेश दिले, पॉश मशीनही देण्यात आली परिसरातील रास्त भाव दुकानातील रेशन कार्ड जोडून देण्याचे सांगितले ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धंतोलीच्या पुरवठा निरीक्षकांनी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आणि तेव्हापासूनच दुकानाला सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. अधिकाऱ्याकडून विविध कारणे देत दुकान सुरू करण्याची प्रक्रिया लाबविण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने उपजिल्हाधिकारी खाडे यांच्याकडे दिलेले निवेदनातून केला आहे यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील दिनेश ताजने संगीता टेंभुर्णे माया शेंडे आदिचा समावेश होता.