आपला जिल्हाराजकीय

नागपूरमधील जनसमस्या विरोधात शिवसेना आक्रमक…

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

नागपूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज नागपूर शहरातील विविध समस्या विरोधात महानगरपालिकेवर राज्य संघटक सागर डबरासे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला व मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले,

निवेदनात म्हटले की महाराष्ट्र राज्यात नागपूर महानगरपालिका अ दर्जात येऊन सुद्धा येथील नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावं लागत त्यामध्ये विशेषता उत्तर नागपूर दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूर तसेच पूर्व नागपूर मधील अनेक वस्त्यांमध्ये रस्ते/रोड नाहीत, शिवर लाईन आणि गटर लाईन चोक झालेल्या आहेत त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने पावसाळ्यात अनेकांच्या घरांमध्ये हे घाण पाणी जाते, तसेच नियमित साफसफाई होत नाही बीव्हीजी कंपनीकडे गाड्या आणि संसाधन कमी असल्यामुळे आठवडयात एकदाच कचऱ्याच्या गाड्या सुद्धा अनेक वस्त्यांमध्ये जात असते,अशा अनेक समस्यांना नागपूरकरांना समोर जावं लागते,

त्याचप्रमाणे ओ सी डब्ल्यू कंपनी च्या मनमानी कारभारामुळे नागपूर कर त्रस्त आहेत,
ज्याप्रमाणे ओ सी डब्ल्यू कंपनीने 24 तास आणि सात दिवस पाणी देण्याचा करार केला होता तो पूर्णपणे खोटा ठरला आहे 24 तास तर दूर कसेतरी दोन तीन तास पाणी मिळते त्याला सुद्धा फोर्स नसतो आणि काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे ते सुद्धा घाण पाणी त्या लोकांना मिळतं,
आणि उलट ओ सी डब्ल्यू कंपनीने मार्च एप्रिल महिन्याचे एवरेज बिल येत असलेल्या बिलाच्या तीन पट रकमेचे बिल मीटर धारकांना पाठविलेले आहे, यावर झोन स्तरावर डेलिगेट कडे चौकशी केली असता त्यांचे म्हणणे आहे की मीटर फॉल्टी असल्यामुळे एवढ्या रकमेचे बिल पाठविण्यात आलेले आहे, मीटरची रखरखाव दुरुस्तीची जबाबदारी ओसीडब्ल्यू कंपनीची आहे म्हणून ओ सी डब्ल्यू कंपनीने फॉल्टी मीटरांची दुरुस्ती करावी,व नागपूरकरांना वाढीव बिलांची रक्कम कमी करावी, व ज्या पद्धतीने जुने बिल होते त्याच रकमेचे बिल नागपूरकरांना पुन्हा पाठविण्यात यावे.
या सर्व समस्यांचे निवेदन आयुक्तांना दिले यावर मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांनी सर्व समस्याचे निराकरण लवकरात लवकर करू अशे आश्वासन दिले,
दिलेले आश्वासन आयुक्तानी पूर्ण न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल.

ही बातमी वाचा.  Apple sets March 21 event, Wall Street sees new, smaller iPhone


याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख मनोज शाहू,अफसर सिद्दिकी, पक्ष विस्थारक विक्रम राठोड, हरिभाऊ बानाईत,दीपक पोहनकर,शिववाहतूक सेनाचे जिल्हाप्रमुख राजेश वाघमारे, सागर चरडे, सचिन कापसे नरेंद्र तिरपुडे शरद दंडाळे,महिला उपशहर प्रमुख मंगला राणे,उपजिल्हा संघटिका मिना अडकणे, रंजना राजपांडे, सादिया शेख,बबलू दरोडे, चंद्रशेखर ढोणे, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजेश रंगारी,सिद्धू कोमलवार रवींद्र भिशीकर शुभम शिंदे, दुर्गेश वाघमारे, चंद्रशेखर ढोणे,शुभम श्रीवास,रोहित वाघमारे, नसीम पठाण सुलतान अन्सारी अकिल मलिक,मोहम्मद गौहर सोबत सोबत अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.