
वरुड : मोर्शी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे युवा नेते माजी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे(16ऑगस्ट)ला वरुड मध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
त्यांच्या प्रवेशावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉ. अनिल बोंडे आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर माजी खासदार रामदास तडस आदी मान्यवर उपस्थित राहतील.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला गेल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही अखेर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली त्यांच्या उमेदवारीमुळे मताचे विभाजन होऊन काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवाराला पराभवाचा फटका बसला होता गेल्या काही दिवसापूर्वी विक्रम ठाकरे यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे यांनी भाजपात प्रवेश करावा असा आग्रही भूमिका मांडली होती शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही ठाकरे यांनी भाजपचे नेते खासदार डॉ.अनिल मुंडे यांच्याशी युती करून लढविली होती तेव्हापासून विक्रम ठाकरे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आता विक्रम ठाकरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.