सोमलवार शाळा माँ उमिया ब्रँच येथील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात…
विशेष प्रतिनिधी

नागपूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक सागर डबरासे सागर डबरासे यांच्या नेतृत्वात राज्याचे शिक्षण मंत्री,सचिव शिक्षण मंत्रालय,शिक्षण संचालक पुणे यांना नागपूरच्या शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले,
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख मनोज शाहू, मा.युवा जिल्हाप्रमुख विक्रम राठोड नरेंद्र तिरपुडे,शरद दंडाळे,निलेश खडसन, अरविंद कारेमोरे,अर्पित बागडे, नितेश रंगारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की सोमलवार अकाडमी अंतर्गत सोमलवार शाळा भंडारा रोड नागपूर या शाळेत हजारोच्या संख्येत लहान तसेच मोठे मुले शिक्षण घेतात,
परंतु या शाळेत दररोज विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत आहे, कारण या शाळेच्या दोन बिल्डिंग च्या मध्यभागातून आणि खेळण्याच्या प्ले ग्राउंड मधून तसेच शाळेच्या मेन गेट वरुन जिथे मुलांना नेण्या आणन्याकरिता बसेस उभ्या असतात आणि याच मेन गेट मधून मुलांचे येणे जाने आहे,या सर्वच ठीकाणावरून विद्युत महापारेषणची 132/220 केव्ही ची हायटेन्शनची लाईन गेलेली आहे ती अत्यंत घातक आहे कारण या अगोदर त्याच लाईन खाली अन्य ठिकाणी अनेक लोकांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत,
यामुळे महापारेषन ने सोमलवार शाळेला मागील अनेक वर्षापासून लिखित नोटीस दिलेले आहेत तरी शाळेने याची दखल घेतलेली नाही,
म्हणून शिवसेना तर्फे शिक्षण अधिकारी नागपूर तसेच उपसंचालक नागपूर विभाग यांना 18/06/2024 पासून 18/1/2025 पर्यंत निवेदनाद्वारे अनेक पत्रव्यवहार केलेले असून त्यावर शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांनी विभागीय चौकशी केली असता त्यांच्या निदर्शनास आले की खरंच विद्यार्थ्यांच्या जीवाला धोखा आहे म्हणून शाळेला दुसऱ्या ठीकानी हलवीन्याबाबत (स्थालांतर) करण्याबाबत पत्रव्यवहार केलें परंतु शाळेने दखल घेतली नाही म्हणून शिक्षण अधिकारी यांनी दि. 27/1/2025 ला सोमलवार शाळेची मान्यता तात्काळ काढण्याबाबत शिक्षण विभागिय उपसंचालक यांना सीफारस पत्र दिले तरी 4 महिने लोटून सुद्धा उपसंचालकांनी शाळेवर कोणतीही कारवाई केली नाही म्हणजेच संपूर्ण शिक्षण विभाग घोटाळ्यात आहे त्यामुळेच उलट सोमलवार शाळेने 2025-26 चे नवीन ऍडमिशन सुरु केले आहे
म्हणून आज दि. 21/4/2025 ला शिवसेना तर्फे शिक्षण अधिकारी मार्फत शिक्षण सचिव मंत्रालय आणि संचालक पुणे यांना निवेदन देऊन सोमलवार शाळेमध्ये नवीन ऍडमिशन बंद करण्याबाबत तसेच या शाळेची मान्यता तात्काळ काढण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले,
अन्यथा शिवसेना तर्फे तीव्र आंदोलन कारण्याचा इशारा देण्यात आला.