महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी राज्यात दारूची दुकानें बंद करावीत, रिपब्लिक फेडरेशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र…
प्रतिनिधी

नागपूर :रिपब्लिक फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष सागर डबरासे यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना मा.जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांच्या मार्फत 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी राज्यात दारू दुकानें बंद ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी निवेदन देते वेळी प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे, प्रदेश महासचिव राजेश गजघाटे जिल्ह्याध्यक्ष धर्मपाल वंजारी,राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे विदर्भ युवा उपाध्यक्ष सचिन कापसे,गणेश मस्के, शरद दंडाळे, नितेश रंगारी,निलेश खडसन,अरविंद कारेमोरे, नरेंद्र तिरपूडे, अर्पित बागडे,पूनम रंगारी,मधुबाला पाटील, सुजाता वासनिक,मीनाक्षी बारमाटे, नीलम पाटील, दुर्गा विश्वकर्मा सोबत सोबत अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.
निवेदनाद्वारे म्हटले की की 14 एप्रिल या दिवशी भारतरत्न, संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते,म्हणून या दिवशी जाणीवतापूर्वक काही असामाजिक तत्वाचे लोक दारू पिऊन हूडदंग करून राज्याचे वातावरण दूषित करतात त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांचा अपमान होतो त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जातात,
म्हणून ज्याप्रमाणे 2 ऑक्टोंबर ला महात्मा गांधी जयंती तसेच गांधी सप्ताह च्या दिवशी सुद्धा प्रशासनाद्वारे राज्यात आणि शहरात देशी -विदेशी दारूचे दुकानें बंद केली जातात,
त्याचप्रमाने 14 एप्रिल ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सुद्धा देशी-विदेशी दारूचे दुकानें व बिअर बार, परमिट रूम आपण बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत जेणेकरून महान संविधान निर्मात्याच्या जयंती ला गालबोट लागणार नाही.