महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन होताच एकाला ताबडतोब न्याय मिळाला….
मुंबई प्रतिनिधी

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना लवादाने मोठा दिलासा दिला आहे,
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता दिल्लीतील लवादाने परत केली आहे,
आयकर विभागाने ऑक्टोम्बर 2021 मध्ये धाड टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियाशी संबंधित असलेली सुमारे 1000 कोटीची संपत्ती जप्त केली होती,अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या मलमत्तासह नातेवायकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉईंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त केल्या होत्या,
शपथविधीपूर्वी एक दिवस आधी अजित पवार दिल्लीला गेले होते त्यावेळी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्या बाबतचे वृत्त मोठ्या प्रमाणात पसरले होते त्यावर पवार यांनी आपण दिल्लीला खासगी कामासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली होती.