
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी डाका ही वकील संघटना बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी अधिवक्ता मुन्ना उर्फ भुनेश्वर ऊके यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालयापासून ते संविधान चौक पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ नारे देत शिस्तबद्ध पद्धतीने पायी चालत आले,
ज्यामध्ये शेकडो महिला पुरुष वकिलांची संख्या होती,
संविधान चौक येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या संघटनेतर्फे माल्यार्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
:भारतीय राज्यघटना:
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताला पवित्र अशी राज्यघटना बहाल केली.भारतीय राज्यघटनेनुसार देशाला घटनेचे राज्य प्राप्त झाले. यामुळे देशात समता ,स्वातंत्र्य ,
न्याय व बंधुत्व या मूल्यांना
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये रुजविण्यात आले आहे .
या कारणाने भारत हा विविध जाती आणि धर्माने नटलेला असला तरी सुद्धा तो आज अखंड आहे .हे राज्यघटनेचे धोतक आहे आणि याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान सभेला जाते.
२६ नोव्हेंबर हा दिवस भारत सरकारने संविधान दिवस म्हणून घोषित केला आहे .हा भारतीय विधी दिन – संविधान दिवस म्हणून ओळखल्या जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय संविधानाच्या निर्मिती करिता मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती या समितीच्या अनेक बैठका व चर्चा नंतर समितीने अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने तो स्वीकृत केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची पवित्र राज्यघटना लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली . यामुळे या दिवसापासून कायद्याचे राज्य देशात स्थापन झाले करिता तत्कालीन सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिना निमित्त त्यांच्या सन्मानार्थ २६ नोव्हेंबर २०१५ पासून संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला .
पहिला संविधान दिवस २०१५ ला देशांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज कालावधीत ९ वर्ष पूर्ण होत आहे .दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञ व्यक्त करण्याकरिता व संविधानाचे महत्त्व व त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने संविधान दिवस देशभर शासकीय पातळीवर व सामाजिक स्तरावर साजरा करण्यात येत असतो.