आपला जिल्हासामाजिक

रिपब्लिक फेडरेशन ने महाबोधी महाविहार मुक्ती करिता दिले राष्ट्रपतींना निवेदन…

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

नागपूर -रिपब्लिक फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना तर्फे रिपब्लिक फेडरेशन के अध्यक्ष सागर डबरासे यांच्या नेतृत्वात देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदि मुर्म यांना नागपूर चे जिल्हाधिकारी मार्फत बिहार स्थित बोधगया महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याबाबत निवेदन देण्यात आले.


निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष धर्मपाल वंजारी, शरद दंडाळे, निलेश खडसन, अरविंद कारेमोरे, नितेश रंगारी,नरेंद्र तिरपूडे, राजेश गजघाटे,मयूर पाटील,अर्पित बागडे,पूनम रंगारी,मधुबाला पाटील, सुजाता वासनिक, दयाराम फुले, रामदास घोरपडे,प्रशांत डबरासे, संजय फुले,शशी नगरारे, प्रशांत फुले सोबत सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते


निवेदनात म्हटले की 1950 मध्ये भारत गणराज्य बनले त्यावेळी देशातील 1950 च्या अगोदर चे सर्व कायदे रद्द करण्यात आले परंतु बिहार स्थित महाबोधी महाविहार आतापर्यंत सुद्धा 1949 च्या मंदिर अधिनियम कायद्याअंतर्गतच अधीन आहे
हेच महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ आहे पण या महाविहाराचे पूर्ण नियंत्रण अद्यापही बौद्धांच्याकडे नाही,
वर्तमान परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारचे धार्मिक अनुष्ठान केले जातात आणि तथागत बौद्धांच्या मूर्तीचा अपमान जाणीवतापूर्वक केल्या जात आहे त्यामुळे बौद्ध धर्माच्या तसेच बुद्धाला मानणाऱ्या लोकांच्या भावना जाणीवतापूर्वक दुखावल्या जात आहे,
त्यामुळे 1949 च्या मंदिर अधिनियम कायद्याला समाप्त करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा बौद्धांना देण्यात यावा ही फेडरेशनची प्रमुख मागणी आहे,

ही बातमी वाचा.  संत गाडगेबाबा आश्रमाचे वतीने २५ डिसेंबरला विचार समन्वय परिषद...

सध्याच्या परिस्थितीत अखिल भारतीय बौद्ध फोरम चे महासचिव भन्ते आकाश लामा यांच्या नेतृत्वात बुद्धगया मध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला देशा विदेशातून बौद्धांचे समर्थन प्राप्त होत आहे त्यामुळे या आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे कारण बुद्धगया मधील महाविहार हे बौद्धांचे तीर्थक्षेत्र तसेच आस्तेचे केंद्र आहे,
म्हणून राष्ट्रपती महामहीम यांनी या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष देऊन 1949 मंदिर अधिनियम कायदा रद्द करून हे संपूर्ण महाबोधी महाविहार बौद्धांना सुपूर्द करावे,

तसेच आंदोलनामध्ये बसलेले बौद्ध धम्मगुरु आणि अनुयायावर बिहार पोलीस चे अधिकारी जाणीवतापूर्वक लाठी चार्ज करून या आंदोलनाला चुकीच्या मार्गाने नेण्याचे कट कारस्थान करत आहे म्हणून संबंधित गुन्हेगार पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व बौद्ध धम्म गुरु तसेच अनुयायांना सुरक्षा प्रदान करावी.

 


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.