
महाराष्ट्र राजकारण: महाराष्ट्र राज्यात बौद्धांची संख्या 2011 च्या जनगणनेनुसार 65 लाखाच्या वरती आहे, म्हणजेच आता जवळपास 80 लाखाच्या आसपास किंवा जास्त संख्येत असेलच,
निवडणूक आयोगाने अनुसूचित जातीच्या मताच्या आकड्यानुसार राज्यात लोकसभा आणि विधानसभेची आखणी करून त्या त्या क्षेत्राला लोकसभा आणि विधानसभा (S/C) करिता आरक्षित केलेली आहे,
आपण सरासरी विचार केला तर पूर्व विदर्भात 14 लाख 50 हजाराच्या जवळपास आहे आणि पश्चिम विदर्भामध्ये 15 लाख 70 हजाराच्या जवळपास आणि उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये मध्ये 40 लाखाच्या वरती बौद्धांची संख्या आहे,
महाराष्ट्र राज्यामध्ये काही मतदारसंघ अशे आहेत की बौद्धांच्या मताच्या भरोशावरच तेथील प्रतिनिधी निवडून येऊ शकतात,
असे असले तरी महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्ध समाजाचा एकही खासदार आणि आमदार प्रस्थापित भाजपा,काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अन्य राजकीय पक्षाच्या तिकिटाविना किंवा सहाऱ्याविना स्वबळावर निवडून येऊ शकत नाही यावर समाजातील कोणत्याही प्रतिष्ठित नागरिकांनी किंवा नेत्यांनी संशोधन केलेच नाही!
बौद्ध समाजाचे प्रस्थापित पुढारी फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाच्या युवा तसेच तरुण पिढीचा उपयोग करतात जेव्हा जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा त्याचा उपयोग करतात आणि त्यांची गरज भासली की लगेच त्याला दुधात पडल्या माशी सारखे काढून बाहेर फेकतात, मग त्या कार्यकर्त्यांच्या समोर दोनच पर्याय असतात एक तर राजकारण सोडून घरी बसणे किंवा ज्याला राजकीय क्षेत्रात जाऊन समाजसेवा करण्यासाठी व स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षात जाऊन काम करणे,यामुळे प्रस्थापित बौद्ध समाजाच्या राजकीय पुढाऱ्यांमुळे संपूर्ण महान चळवळीचं वाटोळ झालेलं असून बौद्ध समाजाची राजकीय ताकद कुठेही दिसून येत नाही, म्हणून निवडणुकीत शेवटी संपूर्ण राज्यातील बौद्ध समाज भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षांना पर्याय नसल्या मुळे डोळे लावून मतदान करतात,
त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा सारखे पक्ष त्या मतदार संघात बौद्धांची संख्या कितीही जरी असली तरी शेवटी जे काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा सारख्या पक्षांमध्ये बौद्ध समाजाचे जे काही चरणदास आणि त्यांचे पूर्वीचे दास असतात त्यांच्या वाट्यालाच थोडीफार मलाई येते,उर्वरित समाजातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना कोणीही विचारात घेत नाहीत,,,,,,,
म्हणून शेवटी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम साहेबांच्या नंतर एखादा तरी पुढारी या काळात जन्माला येईल काय? की जो समाजातील तरुणांना खरी प्रामाणिक राजकीय दिशा दाखवेल?
क्रमशा……
भाग-1