
वरुड:परभणीत झालेल्या अमान्य कृत्यामुळे भारताचा राष्ट्रीय पवित्र ग्रंथ संविधान या संविधानाची प्रतिकृती एका माथेफीरु व्यक्तीने परभणीच्या आंबेडकर चौकात असलेल्या संविधानाची तोडफोड केली त्या निषेधार्थ अशी घटना ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आज दिनांक 12 डिसेंबरला वरुड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
ज्या व्यक्तीने अशी कृत्य केले देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर लावावा व त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे व त्याच्या मागे आणखी कोण आहे याची शहानीशा करून सर्वांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे सर्व उपस्थित आम्ही भारतातील लोक यांनी निषेध व्यक्त केला या निषेधार्थ उपस्थित भारतीय बौद्ध महासभा वरूड मोर्शी विभाग जिल्हा अमरावती सदस्य आक्रोश जनशक्ती संघटना वरुड सम्यक युवा संघटक वरुड आणि राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य सर्वांना मिळून आम्ही भारताचे लोक होऊन मी भारतीय म्हणून या झालेल्या घटनेचा निषेधार्थ निवेदन देण्यात आले.