
वरुड:करुणा बुद्ध विहार वरूड येथे अशोकभाऊ सरस्वती यांचे व्याख्यान संपन्न झाले,
संत गाडगेबाबा विचार प्रबोधन यात्रा महोत्सव समितीतर्फे पुरोगामी संत आणि विचारवंत यांच्या अनुयायात समन्वयाची गरज या विषयावर प्रबोधन यात्रा महोत्सवाचे आयोजक अशोकभाऊ सरस्वती यांचे व्याख्यान संपन्न झाले. सर्व पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारे लोक मात्र एकत्र येऊन कार्य करीत नाही असा खेद व्यक्त करीत आता तरी आम्ही जाती घर्माच्या भिंती तोडून एकसंघ कार्य केले पाहिजे. तरच देशाचे संविधान वाचवू शकतो.असा विचार त्यांनी मांडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी तेजोदिप्त यांनी केले तर प्रास्ताविक चंद्रशेखर अढाऊ सर यांनी केले कार्यकमाचे अध्यक्ष धम्मचारी बोधिनंद्न होते. पूजेचे नेतृत्व धुताले ताई, लक्ष्मीताई मेश्राम यांनी केले.विनोद बागडे यांनी सुंदर आवाजात आपली डियर बाबा ही गझल सादर केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मचारी श्रद्धादित्य इंजि.डबरासे ,माणिकराव बागडे इत्यादी नी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन करून धम्मचारी कुशलसत्व यांनी केला