
वरुड :कृषी उत्पन्न बाजार समिती वरूड चे परिसरात ए. टी. एम सेवा उपलब्ध…
वरूड कृषी उत्पन्न बाजार समिती चे परिसरात ए टी एम असाव अशी शेतकरी शेतमजूर व्यापारी व अडते परिसरातील नागरिक नागरिक यांची मागणी होती त्या मागणी नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक मंडळानी पुढाकर घेऊन बँकांना संपर्क साधून या परिसरात ए टी एम सेवा उपलब्ध व्हावी या करीता पाठपुरावा केला गेला व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी या बाबीला दुजोरा देत कृषी उत्पन्न बाजार समिती वरूड येथे ए टी एम सेवा उपलब्ध करून दिली व त्या करीता लागणारी जागा दुकान गाडे कृषी उत्पन्न बाजार समिती ने उपलब्ध करून दिले व ए टी एम सेवा सुरू झाली असून चोवीस तास सेवा उपलब्ध आहे शेतकरी शेतमजूर अडते व्यापारी नागरिक यांचे करीता ए टी एम सेवचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक मंडळानी केले आहे