
मुंबई :महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे.या उमेदवारी यादीत 65 जणांना संधी देण्यात आली आहे.या यादीत मुंबईतील 13 मतदारसंघाचा समावेश आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीत 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे…
महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) पक्षाचं जागावाटप आता निश्चित झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांना आता 288 जागांपैकी प्रत्येकी 85-85-85 चा फॉर्म्युला समोर आला आहे. तसेच उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.