महात्मा फुले महाविद्यालय येथे श्री. संत मारोती महाराज संस्थान माकनेर व्याख्यानमाला संपन्न…
महेंद्र हरले

अमरावती (वरुड):महात्मा फुले महाविद्यालय येथे श्री. संत मारोती महाराज संस्थान माकनेर व्याख्यानमालेचे आयोजन संपन्न झाले.
श्री संत मारोती महाराज संस्था माकनेर, जिल्हा बुलढाणा यांच्याकडून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती प्राप्त दाननिधी मधून विद्यापीठातील रासायनिक तंत्रशास्त्र विभागाच्या वतीने श्री.संत मारोती महाराजांच्या जीवन चरित्रावर , महात्मा फुले कला, वाणिज्य आणि सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड,येथे शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 ला ‘श्री. संत मारोती महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मानव विज्ञान विद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ.मोना चिमोटे यांनी भूषविले.
तसेच प्रा.डॉ. अनिल नाईक,विभाग प्रमुख रासायनिक तंत्रशास्त्र विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, श्री. संत मारोती महाराज संस्थांचे उपाध्यक्ष श्री. ओम प्रकाश देशमुख, जे.डी.पाटील सांगळुदकर महाविद्यालय दर्यापूर येथील प्राचार्य डाॅ. अतुल बोडखे, डाॅ.राजेश उमाळे,श्री. संजय अंगाईतकर,सं.गा.बा.अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व हारार्पणाने करण्यात आली.महाराष्ट्र गीत,विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डाॅ.डी.व्ही.हांडे यांनी केले. आपल्या महाराष्ट्रात संत परंपरा फार जुनी आहे व या संतांचे सामाजिक,आध्यात्मिक,प्रबोधनात्मक कार्य नवीन पिढीकडे पोहोचविणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी विशद केले.
श्री.संत मारोती महाराज संस्थानचे उपाध्यक्ष श्री.ओमप्रकाश देशमुख यांनी महाराजांचा जन्मापासून पूर्णकार्यकाळ सभागृहापुढे मांडला व महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला.
महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे निर्मूलन केले असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्ते डॉ.विनोदअ. कोकणे, प्राध्यापक,पदव्युत्तर मराठी विभाग जे. डी.पाटील सांगळुदकर महाविद्यालय दर्यापूर, यांनी संत मारोती महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक दृष्टिकोन सभागृहासमोर अतिशय मार्मिकपणे उलगडून दाखविला.महाराज हे आत्मज्ञानी पुरुष आहे असे विचार त्यांनी प्रकट केले. त्यांनी स्वतःला या कार्यामध्ये वाहून घेतले व महाराजांचे अद्भूतपूवॆ कार्य सभागृहासमोर विशद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मोना चिमोटे यांनी संतांचे कार्य कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सी.डी.पाखरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.रीना बकाले यांनी केले. या कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा.डॉ.एन.ए. बोडखे या होत्या.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता समितीतील सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाकरिता माकनेरकर भक्तमंडळी व महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक,शिक्षके-तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी या आध्यात्मिक ज्ञानाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाची सांगता महाराजांच्या हस्तलिखित गजराने करण्यात आली.