आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

डॉ.हेमंत शाम सोनारे एम्पॉवरमेंट फाउंडेशन तर्फे संवाद अभिनेत्रीशी… सिद्धी कामत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महेंद्र हरले

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

वरुड :डॉ. हेमंत श्याम सोनारे एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या वतीने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सिद्धी कामत यांना 27 एप्रिल रविवारी वरुडला आमंत्रित करण्यात आले होते

डॉ. हेमंत श्याम सोनारे एम पावरमेंट फाउंडेशन ही संस्था सतत महिलांच्या उन्नतीसाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते आणि त्या उपक्रमाच्या माध्यमाने महिलांना प्रोत्साहित करत असते असाच एक पाऊल म्हणून फाउंडेशननी महिलांना अभिनयक्षेत्र , डिझाईनिंग क्षेत्र आणि मॉडलिंग क्षेत्र याच्यात समोर कसं जावं , कशाप्रकारे काम होतं , कशी मेहनतीची आणि चिकाटीची गरज लागते याची जाणीव व माहिती देण्याकरिता सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सिद्धी कामत यांना वरुडला आमंत्रित केले व महिलांसोबत एक उत्कृष्ट संवाद घडवून आणला व महिलांना सुंदर असे मार्गदर्शन घडवून आणले
*सिद्धी विनायक कामथ * ह्या एक कुशल अभिनेत्री आणि सक्षम समाजसेविका*आहेत त्यांना
मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२०* *मलेशिया* हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी लाडाची मैना ,सेकंड हॅन्ड, अनंत कोटी या नाटकांमध्ये , इरादा ,जग्गा जासूस या हिंदी फिल्म मध्ये ,
वृत्ती ,सांगा बाजीराव , गावाला गोत्यात पंधरा लाख खात्यात, क्लब 52 ह्या मराठी चित्रपटामध्ये ,
शाळा , ७७७ रुपयांत बाबा, शिदोरी ह्या लघु चित्रपटांमध्ये ,
दिया और बाती , क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकांमध्ये ,
लक्ष ,नांदा सौख्यभरे ,क्राइम टाइम ,प्रेमा तुझा रंग कसा ,हास्यरंग ,ये फसा ,गजरा , बाळूमामाच्या नावानं चांगभलं , फुलाला सुगंध मातीचा , क्रिमिनल , जाऊ नको दूर बाबा , माझी माणस, तुमची मुलगी काय करते ह्या मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यांना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२० , समाज गौरव पुरस्कार २०२० ,एस्से शान अवॉर्ड २०२०,आदर्श सेवा सन्मान पुरस्कार २०२१ ासाठी , समाज भूषण पुरस्कार २०२१ ,आंतरराष्ट्रीय मानवता अवॉर्ड २०२१
,राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2022 *, जागतिक टपाल दिन निमित्त स्वतःचे टपाल छायाचित्र (MY STAMP)आणि सत्कार.*.
, राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवा रत्न पुरस्कार 2023
,कलारत्न पुरस्कार 2023
,महाराष्ट्राची रणरागिणी 2023 ,सलाम इंडिया अभिमान पुरस्कार 2023
, कोकण रत्न पुरस्कार 2023
,सरस्वती सन्मान 2023 तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आली आहे असं भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्री सिद्धी कामत यांनी महिलांना त्यांच्या प्रश्नांचे सगळे उत्तर देऊन त्यांना समाधानी केले .सिद्धी कामत यांनी सांगितले की क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये चिकाटी गरजेची असते आणि कोणत्याही क्षेत्रात आपण जेव्हा प्रवेश घेतो तेव्हा कालावधी ही तेवढाच महत्त्वाचा असतो जितक्या लवकर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उतराल तितक्या लवकर तुम्हाला सक्सेस मिळतो पण सक्सेस ची पायरी नेहमी चिकाटीच असते अभिनेत्री सिद्धी कामत यांनी अभिनेत्री बनायच्या प्रवासामध्ये त्यांना कराव्या लागलेल्या खडतळ संघर्षाची माहिती दिली. त्यांच्याशी संवाद साधताना अभिनयासोबतच त्यांनी केलेल्या समाजसेवेची माहिती सर्वांना दिली डॉ. हेमंत शाम सोनारे यांनी एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या कार्याबद्दल व महिला सक्षमीकरणच्या महाराष्ट्रभर होत असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली . त्यांनी महिलांना स्वयंसिध्दा बनवण्याचं मानस घेऊन होत चालू असलेल्या कार्याची संपूर्ण माहिती दिली. या अभिनव कार्यक्रमाला वरुड शहरातल्या सगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित महिला उपस्थित होत्या ‌. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन फाउंडेशनच्या वतीने सौ .रचना हेमंत सोनारे यांनी केले

ही बातमी वाचा.  किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू...

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.