
वरुड तहसील कार्यालयासमोर किसान न्याय हक्क संघर्ष समिती चे वतीने शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून आज पहिल्याच दिवशी तहसीलदार श्री चव्हाण साहेब तालुका कृषी अधिकारी आगरकर ठाणेदार ठोसरे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा केली
त्यामधील संत्रा मोसंबी फळ पिकाचा विमा शेतकऱ्यांना देणे चालू केले असून एक-दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल तसेच अति तापमानाचे टीगर लागू करणे करीता विमा कंपनीकडे वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले एक रुपया पिक विमा मध्ये विमा कंपनीच्या अधिकारी यांना उपोषण मंडपात बोलावून त्या विषयावर चर्चा करून प्रश्न निकाली काढू तसेच लोणी व राजुरा बाजार या दोन्ही महसुली मंडळाचा संत्रा मोसंबी फळ गळती मध्ये समावेश करा या मागणीकरिता तहसीलदार यांनी ही मागणी आम्हाला मान्य करता येणार नाही कारण सदर दोन्ही मंडळे अनुदाना करिता आम्ही गारपीट मध्ये घेतली आहे त्यामुळे फळ गळतीचे अनुदान देता येणार नाही तसेच अतिवृष्टी व गारपिटीचे अनुदान देण्याच्या मागणी करिता सदर मागणी करिता आम्ही शासनाला शेतकऱ्यांना अतिवृष्टी गारपिटचे अनुदान देणे आवश्यक आहे याबाबतचा शासनाला अहवाल पाठविला असून आता ती बाब शासन स्तरावरील असून आम्ही त्यामध्ये पुन्हा पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लावण्याचे काम करू असे आश्वासन दिले परंतु संत्रा व मोसंबी फळ पिक विमा व एक रुपया मधला पिक विमा हा प्रश्न निकाली निघाला असला तरी अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ द्या व फळगडती मध्ये लोणी व राजुरा बाजार महसुली मंडळाचा समावेश करा या मागणीवर समाधानकारक निर्णय न झाल्याने उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषणावर ठाम राहून जो पर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अमर उपोषण सुरू राहील गांधीजी ने सांगितलेल्या शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाचे दखल न घेतल्यास दोन दिवसानंतर आत्मदहना सारखा पर्याय निवडून शासनाकडे मागन्या रेटू असा इशारा उपोषणकर्त्यांनी तहसीलदार व शिष्ट मंडळांना दिला आहे शेतकऱ्याचे आमरण उपोषण चालू असताना आज पहिल्या दिवशी कोणत्याही लोकप्रतिनिधीने या उपोषण मंडपाला भेट दिली नाही त्या उपोषण मंडपाला पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे जिल्हा परिषद चे माजी सदस्य गोपाल मालपे सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष शेशू मानकर उद्धवराव वानखेडे ओबीसी संघटनेचे प्रवीण वानखेडे सौरभ मानकर सुशील बेले व वरूड तालुक्यातील शेकडो शेतकरी व प्रतिष्ठीत नागरिकांनी यांनी भेट दिल्या असून आमरण उपोषला करिता कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पावडे उपसभापती बाबाराव मांगुळकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुषार निकम किसान न्याय हक् संघर्ष समितीचे स्वप्निल खांडेकर अमर ठाकरे सुभाषराव गावंडे पंजाबराव ठाकरे ज्ञानेश्वर ताथोडे निरंजन घाटोडे विष्णू वानखडे सरपंच शिवाजी ठाकरे विकास भोंडे सर्वेश ताथोडे आदी शेतकरी उपोषणाला बसले असून ही शेतकरी लढाई मरो की करो असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत उपोषणाहून उठणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आता या उपोषणात काय निर्णय होणार यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे