
अमरावती-रिपब्लिक फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी वैशालीताई काळे यांची नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष सागर डबरासे यांनी केली.
वैशालीताई काळे या आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्ष पण राहिल्यात आणि त्या दरम्यान त्यांनी रिपब्लिकन सेनेची अमरावती जिल्ह्यात चांगली बांधनी केलेली होती, परंतु स्थानीय आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीला कंटाळून त्यांनी रिपब्लिकन सेनेला सोडले व आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
वैशालीताई काळे या अमरावती मध्ये नेहमीच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रामुख्याने समोर असतात आणि शोषित पीडित असलेल्या जनतेच्या मदतीला नेहमीच धावून जातात,
म्हणून त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना रिपब्लिक फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती देऊन संपूर्ण जिल्ह्यात संघटना वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली.