राजकीय

शिवसेना नेते भास्कर जाधव साहेबांनी विरोधकांवर डागली तोफ…

रामटेक प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

रामटेक: महाविकास आघाडी प्रणित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक विधानसभेचे उमेदवार विशाल बरबटे यांच्या प्रचाराकरिता
शिवसेना नेते व पूर्व विदर्भ विभागीय संपर्क नेते आमदार श्री.भास्कर जाधव साहेब रामटेक मध्ये आले असता,
कन्हान,कांद्री व रामटेक आणि पारशीवनी या ठिकाणी रैली ने प्रचाराला सुरुवात केली, नंतर काही परिसरात पदयात्रा करून मतदारांशी संवाद साधला


सायंकाळी 6 वाजता रामटेक तसेच 8 वाजता पारशीवनी या ठिकाणी जाहीर सभेला मार्गदर्शन केले,
याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करते वेळी विरोधकावर जोरदार टीकास्त्र सोडून शिंदे गटाचे आशिष जयस्वाल आणि काँग्रेस चे बागी उमेदवार राजेंद्र मुळक यांचा खरबूस समाचार घेतला.


सोबत सोबत सुनील केदार आणि खासदार बर्वे तसेच जे जे काँग्रेस पक्षाचे नेते विश्वासघाती राजेंद्र मुळक यांचे नामांकन दाखल करायला गेले होते आणि त्यांचा चोरून लपून प्रचार करत असेल त्यांच्यावर सुद्धा राजेंद्र मुळक सारखी पक्ष निलंबनाची कारवाई काँग्रेस पक्षाने करायला पाहिजे तेव्हाच असल्या लोकांना दुसऱ्याशी विश्वासघात करण्याची सजा काय असते हे खऱ्या अर्थाने कळेल,


विशाल बरबटेबाबत बोलताना म्हटले की विशाल ही व्यक्ती निष्ठावान असून विरोधी उमेदवार सारखे रेती चोर,कोयला चोर किंवा कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावणारी व्यक्ती नसून एक यशस्वी उद्योजक असून सोबत सोबत समाजसेवा सुद्धा मोठ्या प्रमाणात करतात व जनहितार्थ कार्य करतात म्हणून आपण विशाल बरबटे यांच्या पाठीशी राहून त्यांच्या मशाल या चिन्हावर मतदान करून त्यांना विजयी करावे असे जाहीर आव्हाहन केले.

ही बातमी वाचा.  मनोज जरांगेंचं ठरलं! विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा; 3 ते 4 दिवसांत जाहीर करणार उमेदवार

याप्रसंगी प्रदेश संघटक सागर डबरासे, जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, उपजिल्हाप्रमुख प्रेम रोडेकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तर तालुका प्रमुख हेमराज चोखाद्रे यांनी संचालन केले.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.