शिवसेना तर्फे राष्ट्रवादी चे सलील देशमुख यांचा धुव्वादार प्रचार….
विशेष प्रतिनिधी

काटोल-नरखेड मतदार संघांचे महाविकास आघाडी प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सलील अनिल देशमुख यांच्या निवडणूक प्रचारार्थ काटोल येथे मिटिंग पार पडली,
या मिटिंग ला राज्य संघटक सागर डबरासे, आमदार अनिल बाबू देशमुख, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज रेवतकर आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते,
याप्रसंगी सागर डबरासे यांनी मार्गदर्शन करते वेळी म्हटले की भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सहकारी मित्र पक्षांनी मागील दहा वर्षात संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात सत्तेचा दुरुपयोग तसेच सरकारी यंत्रणा हातात घेऊन भारतीय संविधानाची पायमल्ली करून दररोज लोकशाहीचा खून केला जात आहे,
आपल्या महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी सुद्धा म्हटल्या जाते, त्याचबरोबर या संपन्न महाराष्ट्र राज्याला फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा सुद्धा लाभलेला आहे, आणि अशा महान पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात दररोज महापुरुषांचा अपमान या भाजपा तसेच मित्र पक्ष्यांच्या लोकातर्फे केला जात आहे,
म्हणून भाजपाची अत्योशक्ती आणि हुकूमशाही थांबविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) या तीन प्रमुख पक्षांनी देशात तसेच राज्यामध्ये भारतीय संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र साबुत ठेवण्यासाठी “महाविकास आघाडीची” ची स्थापना केलेली आहे याच याच महाविकास आघाडी तर्फे राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत,म्हणून संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडी च्या सर्वच उमेदवारांना निवडून द्यायला पाहिजे,
म्हणून काटोल मतदार संघातून सलील देशमुख यांच्या तुतारी वाजवीणाऱ्या माणूस या चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशे आव्हाहन केले,
आमदार अनिलबाबू देशमुख यांनी मार्गदर्शन परी म्हटले की भाजपा आणि मित्र पक्षाचे सरकार खोटारड सरकार असून फक्त खोट्या अश्वासनाचा भरमार असतो,
सरकारी यत्रनाचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी च्या लोकांना जाणीवतेपूर्वक त्रास दिला जातं आहे,
50,50 कोटी देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि राज्यात आराजकतेचे वातावरण निर्माण करून राज्याला कर्जात टाकले आहे,
म्हणून आपण सर्वांनी यावेळी भाजपाला घरी बसवावे आणि सलील देशमुख यांना निवडून द्यावे अशी विनंती मतदारांना केली.
शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनराज रेवतकर यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि सलीलबाबू देशमुख यांना निवडून देण्याचे आव्हाहन केले.