मोर्शी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकरयांनी फोडले प्रचाराचे नारळ..
महेंद्र हरले

मोर्शी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर यांच्या समर्थनार्थ मोठा जनसागर उसळला आहे!
श्री. श्रीधरभाऊ सोलव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, डॉ. मनोहर आंडे भाजपा नेते, प्रा. विठ्ठल कोल्हे, श्री. राजेंद्रभाऊ आंडे, श्री. महेंद्रभाऊ भातकुले, ॲड. आशिषभाऊ वानखडे जिल्हा अध्यक्ष रयत क्रांति संघटना, श्री. अमितभाऊ कुबडे भाजपा नेते, व श्री. संजयभाऊ खासबागे या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच शिवसेनेचे अमोलभाऊ भुयार यांनी ही जाहीर पाठिंबा दिला आहे. विविध नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चंदूभाऊंना पाठिंबा दर्शवला आहे, यामुळे निवडणुकीचे समीकरण बदलणार आहे. विकास, पारदर्शकता, आणि मोर्शी- वरूडच्या प्रगतीसाठी चंदूभाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती एकजुटीनं उभी आहे. एकत्र येऊन मोर्शीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मतदान करा आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या अशे आव्हाहन यावळी मतदाराणा यावलकर यांनी केले.