राजकीय

निलंबित राजेंद्र मुळक यांच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसचे आमदार सुनील केदार आणि खासदार बर्वे यांच्या उपस्थितीने कसला युतीधर्म पाळला जात आहे ? काँग्रेस ला मतदारांचा प्रश्न?

प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी मित्र पक्षांनी मागील दहा वर्षात संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात सत्तेचा दुरुपयोग तसेच सरकारी यंत्रणा हातात घेऊन भारतीय संविधानाची पायमल्ली करून दररोज लोकशाहीचा खून केला जात आहे,
आपल्या महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी सुद्धा म्हटल्या जाते, त्याचबरोबर या संपन्न महाराष्ट्र राज्याला फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा सुद्धा लाभलेला आहे, आणि अशा महान पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात दररोज महापुरुषांचा अपमान या भाजपा तसेच मित्र पक्ष्यांच्या लोकातर्फे केला जात आहे,
म्हणून भाजपाची अत्योशक्ती आणि हुकूमशाही थांबविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) या तीन प्रमुख पक्षांनी देशात तसेच राज्यामध्ये भारतीय संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच फुले शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र साबुत ठेवण्यासाठी “महाविकास आघाडीची” ची स्थापना केलेली आहे याच याच महाविकास आघाडी तर्फे राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत,

ज्यामध्ये आपल्या रामटेक विधानसभा क्षेत्रामधून महाविकास आघाडी तर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विशाल गंगाधर बरबटे हे “मशाल” या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढत आहेत,
अशे असून सुद्धा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे रामटेक विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढत आहेत आणि मुळक यांचे नामांकन पत्र दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे सोबत सोबत काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते,

ही बातमी वाचा.  विक्रम ठाकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न


आणि आता सुद्धा मुळक यांच्या प्रचारात सुद्धा हेच नेते दररोज त्यांच्यासोबत असतात,
अश्या परिस्थितीत नागपूरच्या जनतेला हाच प्रश्न पडलाय की ही कसली महाविकास आघाडीची युती आहे?
आणि काँग्रेसकडून हा कसला युती धर्म पाळला जात आहे?
शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव साहेबांनी काँग्रेसला हा प्रश्न विचारलाय तेव्हा काँग्रेस पक्षाने तातडीने राजेंद्र मुळक यांना सहा वर्षाकरिता काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले आहे.
परंतु सर्व सामान्य जनतेच्या तोंडून हेच ऐकायला मिळत आहे की मुळक यांनी बगावत केल्यामुळे त्यांना निलंबित केले परंतु मूळक सोबत काँग्रेस चे वर्तमान पदाधिकारी दररोज प्रचारात दिसत आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का नाही?


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.