
मोर्शी विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोर्शी मतदारसंघातली निवडणूक चुरशीची ठरली होती.
यावेळी मोर्शीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) देवेंद्र भुयार आणि भाजपचे उमेश यावलकर हे समोरा-समोर आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे गिरीश कराळे यांच्याविरोधात काँग्रेसचे बंडखोर विक्रम ठाकरे मैदानात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मतविभागणी रोखण्याचे आव्हान आहे. कुणबी, माळी, बुद्धिस्ट आणि मुस्लीम मते निर्णायक आहेत.
त्याव्यतिरिक्त याच मोर्शी विधानसभेतुन चंद्रशेखर रावण यांच्या आझाद समाज पार्टी तुन युवा कार्यकर्ता सुशील बेले, बहुजन समाज पार्टीचे कमलनारायण उईके,वंचित बहुजन आघाडीचे जफरखान फते खान आणि हे सुद्धा निवडणुक रिंगणात आहेत या उमेदवारांना बहुजनांच्या मतासोबत सोबत बहुतांश मते ही अनुसूचित जातीची पडणार आहेत,
म्हणजेच निर्णायक मतांपैकी बौद्धाची मते विभागली जाणार असून याचा फटका कोणाला पडेल हे तर निवडणूकी नंतरच्या निकालतच माहीत पडेल.