
North Nagpur Ground Report- काँग्रेस पक्षाने मेरिटच्या आधारावर नितीन राऊत यांना उमेदवारी जरी दिली असली तरी त्यांना ही 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकणे शक्य तेवढे सोपे नाही,
राऊत यांना काँग्रेस पक्षानी सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसच्या तिकीटवर उतरविले आहे त्यापैकी त्यांचा 2014 च्या विधानसभा निवडणूकित पराभव झाला आणि त्याव्यतिरिक्त त्यांनी एकूण चार वेळा उत्तर नागपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केलं आहे,
ज्यामध्ये त्यांनी बरेच मंत्रीपद सुद्धा भोगले आणि एवढे असून सुद्धा उत्तर नागपूर विधानसभेचा विकास चांगल्या पद्धतीने त्यांच्यामार्फत अद्यापही झालेला नाही,
आजही उत्तर नागपूर विधानसभेकडे नागपूर शहरातील जनता वेगळ्याच दृष्टीने बघतात म्हणजे हा संपूर्ण मतदार संघ (BPL) बिलो पावर लाईनच्या अंतर्गत येतोय की काय असे निदर्शनात येते, याला विशेष कारण म्हणजे इथे न झालेला विकास!
उत्तर नागपूर विधानसभेच्या बहुतांश वस्त्यांमध्ये बरोबर रस्ते नाहीत त्यामुळे बहुतांश वस्तीतील रस्त्यावर पाणी साचलेलं असते त्यामुळे लोकांना येण्या-जाण्याचा खूप त्रास होतो त्यांचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्या ज्यामध्ये बहुतांश वस्त्यातील पाण्याच्या जुन्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्यामुळे लोकांच्या घरी पिण्याचे घाण पाणी येते आणि गडरलाइनच्या भयंकर समस्या आहेत, तसेच नाल्याच्या भिंती तुटल्याच्या खुप मोठ्या समस्या सोबत सोबत अशा अनगीनत समस्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये पहावयास मिळतात.
नितीन राऊत यांच्याकडे विकास करण्यासाठी संपूर्ण पाच वर्षाचा काळ असताना सुद्धा त्यांनी या क्षेत्राचा जसा पाहिजे तसा विकास केलेला नाही आणि उलट आचारसंहिता लागण्याच्या एक महिन्या अगोदर काही कामाचे भूमिपूजन केलेले आहे आणि त्यांनी ज्या कामाचे भूमिपूजन केलेले आहे ते प्रोजेक्ट तरी कधी पूर्ण होतील याची काहीही वेळ आणि मर्यादा नाही,
स्थानीय जनतेच्या सांगण्यानुसार दुसरे विशेष कारण म्हणजे नितीन राऊत हे फक्त निवडणुकीमध्येच लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतात आणि एकदा निवडून आले आणि त्यांना मंत्रिपद भेटले की त्या लोकांना पुन्हा भेटत नाहीत त्यांना साधा वेळ सुद्धा देत नाहीत आणि समोर दिसल्यानंतर सुद्धा जाणीवता पूर्वक लोकांना नजरअंदाज करतात,
तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नितीन राऊत हे बुद्धिस्ट समाजाचे आहेत आणि या उत्तर नागपूर मतदारसंघांमध्ये बौद्धांची संख्या एक लाख अंशी हजाराच्या जवळपास आहे त्यामुळे त्यांना समाजाच्या मतांचा भरघोस फायदा होतो, परंतु जेव्हा 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरा पर्याय म्हणून बुद्धिस्ट समाजाचे किशोर गजभिये बसपाचे तिकिटावर निवडणूक लढले तेव्हा त्यांना 56 हजाराच्या वरती मत पडलेले होते त्यामुळे बौद्धांच्या मतांची वाटणी झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजेच नितीन राऊत यांचा या निवडणुकीत दणदणीत पराभव झाला होता,
बाकी निवडणुकीमध्ये तिसऱ्या पर्यायाचा बुद्धिस्ट उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये नसल्यामुळे समाजाची सर्व मते नितीन राऊत यांच्या वाट्याला गेली त्यामुळे चार वेळा त्यांचा या विधानसभा मतदारसंघातून विजय झाला,
परंतु या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर नागपूर विधानसभेतुन बुद्धिस्ट समाजाची बरीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात दिसून येत आहे,ज्यामध्ये समाजसेवक संघपाल उपरे, वंचित बहुजन आघाडी कडून माजी नगरसेवक मुरलीधर मेश्राम,रिपब्लिकन आघाडीतून रिपाई नेते विश्वास पाटील , पाच टर्म चे नगरसेवक असलेले काँग्रेसचे नगरसेवक आणि ज्यांची ओळख “लोकसेवक” म्हणून आहे अशे मनोज सांगोळे (बसपा) , पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले अतुल खोब्रागडे, खोरीपाकडून रमेश फुले,सोबत सोबत अनेक गणमान्य लोकांची तयारी या निवडणुकीत दिसून येत आहे,
परंतु शेवटी यापैकी किती लोक निवडणूक रिंगणात थांबणार असून निवडणूक लढणार आहेत,
यावर नितीन राऊत यांचे निवडणूक जिंकण्याचे समीकरण दिसून येईल….