राजकीय

वंचित बहुजन आघाडी ची यादी जाहीर….

मुंबई प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

बाळासाहेब आंबेडकरांनी
अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि त्यामध्ये 2019 च्या लोकसभा निवडणूकीत सोशल इंजिनियरिंगचा फार्मुला राबवत अनेक जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली आणि संपूर्ण राज्यात स्वबळावर निवडणुकीक लढवीली तेव्हा त्यांना 42 लाखाच्या वरती लक्षनीय मतदान झालेले होते,

  • त्यामुळे काँग्रेस पक्षाचे बरेच दमदार उमेदवार ज्यामध्ये अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सारख्या अनेक दिग्गजाँचा पराभव झाला.

त्यानंतर लगेच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत एकत्रिकरन करून सोबत निवडणुकीक लढण्याची हाक दिली, परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या मते काँग्रेस ने दिलेली ती हाक फक्त तोंडी असून लिखित स्वरूपात नव्हती म्हणून त्यांनी पुन्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकी स्वबळावर लढविली त्यामध्ये त्यांना 42 लाखावरून फक्त 23 लाखाच्या जवळपासच मतदान झाले, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी चा एकही उमेदवार विधानसभेवर निवडून गेला नाही,

बाळासाहेबांनी 2024 च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा सोबत युती करून निवडणूक लढविन्याचे संकेत दिले परंतु ऐन निवडणूकीच्या तोंडावर ही युती होऊ शकली नाही,
म्हणून लोकसभा निवडणूक पुन्हा वंचित स्वबळावर लढली यामध्ये वंचित बहुजन आघाडी ला फक्त 15 ते 16 लाख मते मिळालीत,

ही बातमी वाचा.  शिवसेना नेते भास्कर जाधव साहेबांनी विशाल बरबटे यांच्या प्रचारार्थ रामटेक विधानसभेत केला भव्य रोड शो....

आता सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवीत आहे आणि या विधानसभेत त्यांनी पुन्हा सोशल इंजिनियरिंग चा फार्मुला वापरत अठरा पगड जातीला उमेदवारी दिली असली तरी निवडणुकी नंतर च वंचित ने होत असलेल्या विधानसभेत किती मजल मारली हे पाहण्यासारखे राहील….


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.