
वरुड: वरुड-मोर्शी विधानसभा मतदार संघात वेगळेच घमासान दिसून येत आहे,
हर्षवर्धन देशमुखांनी गाजवलेला हा मतदार संघ,
म्हणून बरेच वर्चस्व हरवर्षन देशमुखांचे या मतदार संघातआहे,
हर्षवर्धन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)गटाचे वरिष्ठ नेते आहेत, म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळीक त्यांना बघितले जाते.
नुकत्याच पार पडलेल्या वर्धा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अमर काळे निवडून आले,
म्हणून या मतदार संघात महाविकास आघाडी चे पारडे भारी आहे,
हर्षवर्धन देशमुख यांनी वयेचा हवाला देत अगोदरच या निवडणुकीतुन माघार घेतली आहे म्हणून या मतदार संघात राष्ट्रवादी पक्षांकडे नवीन इच्छुक लोकांची खूप गर्दी दिसून येत आहे,
डॉ मनोहर आंडे यांची मागील 3 वर्षांपासून भाजपा कडून तयारी सुरु होती परंतु वेळेवर हा मतदार संघ महायुती मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)गटाकडे जाताना दिसत आहे, आमदार देवेंद्र भुयार यांचे पलडे महायुती मध्ये भारी आहे कारण ते अजित पवारांच्या खूप जवळीक आहेत म्हणून जवळपास त्याची उमेदवारी पक्कीच झाल्याचे समजते,
म्हणून डॉ.आंडे यांनी भाजपा ला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून उमेदवारी मागितली आहे आणि सोबतच, गिरीश कराडे,राजेंद्र आंडे स्वाती मोहन मडगे,चंदू यावलकर,डॉ.प्रवीण चौधरी,विक्रम ठाकरे,
त्याच बरोबर सतरा लोकांनी या मतदार संघातून उमेदवारी करिता अर्ज केलेले आहेत,
परंतु डॉ.आंडे, गिरीश कराडे,चंदू यावलकर यांच्या मध्येच खरी शर्यत पाहायला मिळाळी तरी शेवटी जरुड येथील सिल्वर ओक(हर्षवर्धन देशमुख) या मतदार संघांचे भविष्य ठरविणार हे निश्चित…