ताज्या घडामोडी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील

सागर डबरासे

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक कार्यक्रमाविषयी माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर हा असेल, तर ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. ”

राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

– महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये २३४ सर्वसाधारण मतदारसंघ असून २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर २९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

मतदार हेल्पलाइनच्या आधारे मतदार आपल्या मतदान केंद्रासह इतर माहिती मिळवू शकतात.

– मतदान केंद्रांवर मतदारसंघांसाठी पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील.

– निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी पथकाद्वारे तपासणी केली जाईल.

– ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना आपल्याबाबत तीनदा वृत्तपत्रांतून माहिती द्यावी लागेल.

ही बातमी वाचा.  विशाल बरबटे यांच्या जबरदस्त शक्तिप्रदर्शन रॅलीने विरोधकांचे दनानले धाबे ...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील

निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक

(२२ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार) )

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक

(२९ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार) )

नामनिर्देशन पत्राची छाननी

(३० ऑक्टोबर, २०२४ (बुधवार) )

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक

(४ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार) )

मतदानाचा दिनांक

(२० नोव्हेंबर, २०२४ (बुधवार))

मतमोजणी दिनांक

(२३ नोव्हेंबर, २०२४(शनिवार) )

*निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक

(२५ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार))


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.