
काटोल :भाजप सरकार संविधान विरोधी असल्यामुळेच गुन्हेगाराणा कायद्याची भिती राहाली नाही- दिगांबर डोंगरे
संविधान बचाव समितीच्या वतीन कोंढाळी बंद भव्य मोर्चाचे आयोजन
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमीत शाहा याणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना फैषण म्हणून केलेला अपमान,
परभणी घटनेतील पोलिसांच्या कोठळीत ऍड सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून केलेली हत्या देशात ई वी एम हटवून ब्यालेट पेपरवर निवडणुका घ्यावेत या मागणी साठी कोंढाळी बंद ठेवून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा संविधान बचाव समितीने कोंढाळी शहर अध्यक्ष एकणाथ पाटील ग्रामीण चे बाळासाहेब जाधव आदिवासी नेते रामदास मरकाम मुस्लीम नेते मोहसीन शेख अफसर हुसेन डॉ संजय ठवळे संजय राउत रणजित गायकवाड स्वप्नील व्यास यांच्या नेतृत्त्वात तर बहुजन चळवळीतील काटोल विधानसभेचे प्रमुख नेते दिगांबर डोंगरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शहरातील मुख्य चौकातून बाजार चौकातून मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला त्यानंतरच हुतात्मा स्मारक येथे पोहचल्यावर संविधान बचाव समितीने अध्यक्ष बहुजन वंचीत क्रांति सेनेचे जिल्हा अध्यक्ष काटोल न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली त्यानंतरच मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार भागवत पाटील यांना देण्यात आले मोर्चात दलीत मुस्लीम आदिवासी ओ बी सी बहुजन समुदायातील महीला तरुण ज्येष्ठ बांधव मोठ्या संख्येने शामिल होते त्यावेळेस मोर्चाचे मुख्य संयोजक एकनाथ पाटिल बाळासाहेब जाधव रामदास मरकाम संजय ठवळे अरूण उईक सुमेध गोंडाने मोहसीन शेख रणजित गायकवाड बहुजन क्रांति सेनेचे काटोल तालुका अध्यक्ष विजय डहाट नरखेड तालुका अध्यक्ष सुनिल नारनवरे स्वप्नील व्यास यांनी वरील घटनेचा जाहिर निषेध व्यक्त केला
तर मुख्य मार्गदर्शन म्हणून मार्ग दर्शन करताना दिगांबर डोंगरे म्हणाले की देशात व राज्यात जेव्हा जेव्हा भाजप सरकार येते व जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तेंव्हा तेव्हा राज्यात दलीत आदिवासी ओ बी सी बहुजन समाजावर तसेच महीला विद्यार्थिनी तरुण व प्रामाणिक चळवळीतील कार्यकर्त्यांवर हल्ले केल्या जाते जातीय दंगली घडविल्या जाते महापुरुषांचे अपमानाच्या घटनेत वाढ होते कुठे विद्यार्थिनी नराधमाच्या बळी पडत आहेत महीला सुरक्षित आमदार खासदार वायफळ बोलुन देशाचा राज्याचा अपमान करतात अशाचेच बळी संतोष देशमुख व ऍड सोमनाथ सूर्यवंशी पडले आहेत एकंदरीत देशात व राज्यात भाजप आल्यावर कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे वूडून गुन्हेगारी वाढत जाते व गुन्हेगारांना कायद्याची भीतीच राहत नाही असे दिगांबर डोंगरे म्हणाले मोर्चात बहुजन वंचित क्रांती सेनेचे काटोल तालुका महासचिव अनिल लोखंडे येनवा सर्कल अध्यक्ष अर्जुन शेंडे मेटपांजरा सर्कल चे अध्यक्ष लक्ष्मण बागडे संभाजी सोनुले अंकित रंगारी यांच्यासह हजारो नागरीक सहभागी होते