
तुम्ही ज्यांना मतदान केलं, ज्यांना निवडून देत आहात त्या आमदारांना किती पगार मिळतो? त्यांना किती पगार मिळतो? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
पगार, भत्ता, सुविधा, सवलती,
आमदार हे विधिमंडळ, विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये काम करतात. त्यांना शासनाच्या नियमानुसार पगार, भत्ता, सुविधा, सवलती मिळतात. याबद्दल जाणून घेऊया.
आमदारांना काही सुविधांसाठी भत्ता दिला जातो. त्यानुसार टेलिफोन खर्चासाठी 8 हजार रुपये, स्टेशनरीसाठी 10 हजार रुपये, कॉम्प्युटर 10 हजार रुपये भत्ता दिला जातो.
महिन्याचा पगार..
पगार आणि इतर भत्ते जोडले तर एका आमदाराला महिन्याला साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये रक्कम मिळते.
यासोबत अधिवेशनादरम्यान प्रत्येक आमदाराला दर दिवशी काही विशिष्ट रक्कम भत्त्याच्या स्वरुपात दिली जाते. यानुसार प्रत्येक आमदाराला प्रति दिनी 2 हजार रुपये भत्ता मिळतो.आमदारांसोबत असलेल्या पीएंनादेखील 25 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो.
आमदारांना राज्यांतर्गत प्रवासासाठीदेखील भत्ता दिला जातो. याअंतर्गत आमदारांना दर वर्षाला 15 हजार रुपये मिळतात. एखाद्या आमदाराला महाराष्ट्राबाहेर जायचे असल्यास त्यासाठी सुविधा असते. याअंतर्गत आमदारांना स्वतंत्र 15 हजार रुपये दिले जातात.
मोफत प्रवास:
आमदार विमानतळाहून राज्यांतर्गत 32 वेळा आणि देशांतर्गत 8 वेळा प्रवास करू शकतात.आमदारांना बेस्ट, एमएसआरटीसी आणि एमटीडीसीमध्ये मोफत प्रवास करता योतो.
निवृत्ती वेतन :
आमदारांना पगारासोबत त्यांच्या निवृत्तीचीही खास सुविधा शासनाकडून केली जाते. आमदाराचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याला निवृत्ती वेतन मिळते. तसेच कार्यकाळ सुरु असताना आमदाराचे निधन झाले असल्यास निवृत्ती वेतन त्याच्या कुटुंबाला दिले जाते.
निवृत्ती वेतनात 2 हजार रुपये
माजी आमदाराला प्रति महिना 50 हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाते. एखादा आमदार एकाहून अधिक टर्म आमदार म्हणून कार्यकाळ करत असेल तर टर्मप्रमाणे त्यांच्या निवृत्ती वेतनात 2 हजार रुपये वाढतात.