
मोर्शी – गेल्या अनेक दिवसांपासुन संपुर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेल्या मोर्शी-वरुड विधानसभा मतदरासंघातून आज अपक्ष उमेदवार म्हणुन माजी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी आज आपल्या हजारो समर्थकांसह अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज सादर करतांना उफाळलेला जनसमुदाय विक्रम ठाकरे यांच्या राजकीय ताकदीची साक्ष देणारा ठरला.
गेल्या अनेक दिवसांपासुन संपुर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्शी मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? विक्रम ठाकरे अपक्ष लढणार की महाविकास आघाडीकडून? याबाबत तर्क वितर्क काढण्यात येत असतांना आज सकाळच्या सुमारास महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अधिकृत घोषणा झाल्यानंतर विक्रम ठाकरे हे अपक्ष लढणार यावर सुध्दा शिक्कामोर्तब झाले. गेल्या अनेक दिवसांपासुन विक्रम ठाकरे व त्यांच्या सहका:यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला होता आणि त्यानुसार त्यांनी सर्व प्रकारची तयारी सुध्दा आरंभली होती.
आज सकाळपासुनच वरुड तालुक्यासह मोर्शी तालुक्यातील विविध गावांतून आपआपल्या वाहनातून विक्रम ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आणि विजयी पर्वामध्ये आपला सहभाग नोंदविण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. मोर्शी येथील श्री रामदेवबाबा मंदीरपासुन विक्रम ठाकरे यांच्या महॉरलीला प्रारंभ करण्यात आला होता. मोर्शी मतदारसंघ उमेदवार अर्ज दाखल करताना आज विक्रम ठाकरे यांच्या रॅलीने गर्दीचे सर्वच विक्रम मोडीत काढले. याप्रसंगी आयोजित सभेला संबोधित करताना विक्रम ठाकरे यांनी आपली मतदार संघाविषयीची असलेली विश्वासार्हता नमूद गेली कित्येक वर्ष मतदार संघातील सर्वांचे विविध सामाजिक आणि राजकीय चळवळीत सहकार्य लाभले ते सहकार्य या निवडणुकीत सुद्धा मिळत आहे असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी आपल्या सभेतून व्यक्त केला.यावेळी विक्रम ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपध्दतीवर बोलत सरकार तथा नेत्यांना चांगलेच धारेवर धरत चांगलाच खरपूस समाचार घेतला तसेच विद्यमन आमदारांनी मतदारसंघाचा विकास न करता केवळ स्वत:चा विकास केला. निवडुन येण्यापुर्वी शेतक:यांना केंद्र बिंदू मानणा:या आमदारांनी गेली ५ वर्षे शेतक:यांना वा:यावर सोडले, शेतक:यांसाठी एकही आंदोलन केले नाही, शेतक:यांच्या शेतमालाला भाव मिळवुन देण्यासाठी कधीही पुढाकार घेतला नाही, स्वत: शेतकरी पुत्र म्हणवुन घेणा:या आमदारांनी केवळ जातीपातीचे राजकारण करीत सार्थ साधण्याचे काम केले त्यामुळे आता त्यांना धडा शिकविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले.
धर्मनिरपेक्षता सामाजिक सलोखा आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या विचारांची वारी खांद्यावर घेऊन या मतदारसंघाचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे सुद्धा यावेळी विक्रम ठाकरे यांनी सांगितले.