राजकीय

मध्य नागपूर मधून वंचित बहुजन आघाडी बेदखल…

विशेष प्रतिनिधी.

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

वंचित बहुजन आघाडी ने मध्य नागपूर विधानसभेतून माजी मंत्री व काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांना दोन दिवसांपूर्वीच  उमेदवारी दिली होती, आणि सोबत एबी फॉर्म सुद्धा दिलेला होता,

बहुजन आघाडीने शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल का केला नाही? हाच प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उद्भवतो, 

तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा तीन वाजेच्या आतपर्यंत उमेदवारी अर्ज चांगल्या पद्धतीने दाखल करता येते, असे असताना सुद्धा राजकारणातील अनुभवी आणि परिपक्व असलेले माजी मंत्री  अनिस अहमद हे ऐन तीन वाजताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल का होतात?

कदाचित अनिस अहमद यांना वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढायचेच नव्हती का?की फक्त निवडणूक लढतो म्हणून दिखावाच करायचा होता!

हीच भाषा सर्व सामान्य जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे, 

यामुळे नागपूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या तोंडावर निराशा पाहायला मिळत असून पक्षश्रेष्ठीचे लक्ष फक्त निवडणूकिची उमेदवारी देण्यापुरतेच असून बाकी नियोजनावर कोणत्याही पद्धतीचे अनुभवी नेतृत्व संपूर्ण जिल्ह्यात नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, हीच भाषा वंचित च्या कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

या झालेल्या प्रकरणानंतर  पक्षप्रमुख नागपूर जिल्ह्यावर काय विशेष लक्ष देतात हा येणारा काळच सांगेल.

 


Share
ही बातमी वाचा.  Samsung Elec says preorders for Galaxy S7 phones stronger

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.