
ऊत्तर नागपूर विधानभेत बहुजन समाज पार्टीचे केडर बेस मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणूनच नागपूर महानगरपालिकेत दहा नगरसेवक फक्त उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामधूनच निवडून येतात,
म्हणून अशा मजबूत उत्तर नागपूर विधानसभेतून विधानसभेची तिकीट मागणाऱ्याची गर्दी असते कारण 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये किशोर गजभिये यांना 56 हजाराच्या वरती मते बसपाच्या हत्तीवर पडलेली होती,
म्हणून या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मागील वीस वर्षापासून निवडणुकीची तयारी करत असलेले बुद्धम राऊत हे उत्तर नागपूर मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते त्यांच्यासोबतच काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे यांनी सुद्धा बसपाच्या तिकीट ची मागणी पक्षाकडे केलेली होती अशा परिस्थितीमध्ये बुद्धम् राऊत आणि मनोज सांगोळे या दोघांना सुद्धा पक्षाने एबी फॉर्म दिलेले होते, त्यानुसारच मनोज सांगोळे यांनी 28 ऑक्टोबरलाच आपले नामांकन पत्र भरती वेळी बसपाचा एबी फॉर्म सोबत जोडलेला होता,
त्यानंतर बुद्धम राऊत यांनी सुद्धा 29 ऑक्टोबर ला आपला उमेदवारी अर्ज पक्षांनी दिलेल्या एबी फॉर्म सोबत दाखल केला, परंतु बुद्धम् राऊत यांनी जोडलेल्या फॉर्ममध्ये दिलेल्या एबी फॉर्म पैकी बी फॉर्म मध्ये खाली मनोज सांगोळे आणि बुद्धम् राऊत यांचे नाव असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देसाई यांनी त्रुटनी मध्ये बुद्धम् राऊत यांचा अर्ज रद्द करून मनोज सांगोळे यांनाच बहुजन समाज पक्षाचा उमेदवार घोषित केला आहे म्हणजेच मनोज सांगोळे हेच बहुजन समाज पक्षाचे उत्तर नागपूर विधानसभेतील अधिकृत उमेदवार असतील,
बुद्धम् राऊत सोबत बातचीत केली असता राऊत यांचे म्हणणे आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून या अन्यायाविरोधात ते हायकोर्टात केस दाखल करणार आहेत…