
रामटेक -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल बरबटे महाविकास आघाडी तर्फे 28 ऑक्टोबर ला रामटेक तहसील कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत,
28 ऑक्टोबर ला सकाळी 10 वाजता पासून रामटेक बस स्टॉप ते तहसील कार्यालय पर्यंत आपले शक्ती प्रदर्शन करून ते आपले नामांकन अर्ज दाखल करतील…
ज्यावेळी शिवसेनामधून
एकनाथ शिंदे आणि आशिष जैस्वाल सोबत सोबत बरीच मंडळी बाहेर पडली तेव्हा मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते ज्यामध्ये
विशाल बरबटे हे सुद्धा कायम ठाकरे परिवारासोबत होते,
त्याच वेळी त्यांना रामटेक विधानसभामधून उमेदवारी देण्यात आली होती अशी माहिती आहे,
अश्या कठीण परिस्थितीत विशाल बरबटे यांनी संयम ठेऊन पक्षातील लोकांना सोबत घेऊन या विधानसभेत आपला जनसंपर्क वाढवीला व रामटेक, मनसर, पारशीवनी तसेच कन्हान ला आपले जनसंपर्क कार्यालय उघडून जनतेच्या समस्या ऐकून त्यावर आंदोलने केलीत,
त्यांचाच परिणाम आता रामटेक विधानसभेत शिवसेनेची ताकत मोठ्या प्रमाणात वाढली असून ही विधानसभा मोठ्या फरकाच्या लीडणे निवडून येणार अशी खात्री विशाल बरबटे आणि संपूर्ण शिवसैनिकांना आहे…