रामटेकमधून विशाल बरबटे यांनी शक्ती प्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज….
रामटेक(नागपूर):शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल बरबटे यांनी आज 28 ऑक्टोबर ला रामटेक बस स्टॉप चौक ते एस.डी.ओ. कार्यालया पर्यत शक्तिप्रदर्शन करीत आपले नामांकन दाखल केले,
विशाल बरबटे हे मागील 2 वर्षापासून रामटेक विधानसभेची तयारी करीत होते त्यानुसार त्यांनी या विधानसभेत अनेक ठिकाणी मेळावे घेतले, व जनतेच्या संपर्कात राहिले..
विशाल बरबटे सोबत नामांकन भरते वेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काही काँग्रेसचे पदाधिकारी तसेच शिवसेना नागपूर जिल्हा व नागपूर शहरातून मोठ्या संख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते,
शिवसेना कार्यकर्त्याच्या उत्स्फूर्त भिडणे आज संपूर्ण रामटेक शहर दनानून गेले होते,यावरून विशाल बरबटे यांचा होत असलेल्या रामटेक विधानसभेतून नक्कीच विजय होईल अशी प्रतिक्रिया प्रत्येक नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत होत्या.