देश विदेशसामाजिक

महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती या भव्य धार्मिक मेळाव्याच्या सुरक्षेची देखरेख करणाऱ्या पोलिस प्रमुखांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. मृतांमधील 25 जणांची ओळख पटली, इतर 5 जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच 60 जण जखमी असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे.

चेंगराचेंगरी झाल्यानंतर स्थानिक रिपोर्ट आणि प्रयागराजमधील नागरिकांकडून मृतांच्या आकड्यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात होते. यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. यानंतर अखेर प्रशासनाने अधिकृतपणे मृतांचा आकडा जाहीर केला आहे.
महाकुंभमेळा प्रशासनाचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, काही भाविक बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी काही भाविक झोपलेले होते जे चिरडले गेले. डीआयजी म्हणाले की तिथे कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल नव्हता. जखमींच्या माहितीसाठी 1920 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे

प्रयागराज महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 90 जण जखमी झाले होते, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली आहे अशी माहिती मेळा प्रशासनाने पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी दिली आहे. कर्नाटकातील चार आणि गुजरातमधील एका भाविकाचीही ओळख पटली आहे.


Share
ही बातमी वाचा.  Killing Floor 2 New Sharpshooter Class Detailed

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.