भ्रष्ट स्टॅम्प वेंडरची परवाने रद्द करा शिवसेनेची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी…
प्रतिनिधी

नागपूर:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपनिवासी जिल्हाधिकारी विनय खांडे मार्फत महसूल मंत्री यांना राज्य संघटक सागर डबरासे यांच्या मार्गदर्शना खाली आणि उपजिल्हाप्रमुख मनोज शाहू यांच्या नेतृत्वात 500 रुपयाचे स्टॅम्प उपलब्द करून, स्टॅम्प वेंडर वरती कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत,
निवेदन दिले याप्रसंगी शरद दंडाळे, नितेश रंगारी,अरविंद कारेमोरे, अर्पित बागडे, नरेंद्र तिरपूडे उपस्थित होते
निवेदनात सांगितले की दैनंदिन कामकाजातील अनेक व्यवहारात 500 रुपयांच्या स्टॅम्प ची गरज असते,
अश्या परिस्थितीतसुद्धा मार्केट मध्ये अनेक महिन्यापासून 500 रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध नाहीत अशी सूचना स्टॅम्प वेंडर जनतेला देतात,
आणि सामान्य जनतेला स्टॅम्प न देता परत पाठवितात,
नंतर कोणीतरी मध्यस्था करून स्टॅम्प ची व्यवस्था करून देतो परंतु 500 रुपयाचा स्टॅम्प वरती 200 रुपये अतिरिक्त द्यावे लागेल अशे सांगून ग्राहकांना 500 चा स्टॅम्प 700 रुपया मध्ये उपलब्ध करून देतात,
हाच प्रकार दि. 26/12/24 ला सायंकाळी 4:05 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील एकनाथ दरोडे मुद्रांक विक्रेता परवाना क्र.14/86 यांच्या कडे घडला आहे यामध्ये मनोज शाहू यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प ची मांगणी केली असता वेंडर नी सरळ सांगितले की 500 चा स्टॅम्प उपलब्द नाही परंतू 200 अतिरिक्त देत असाल तर देतो तेव्हा शाहू यांनी 500 च्या 2 नोटा वेंडर ला दिल्या आणि वेंडर नी शाहू यांना 300 रुपये परत केले व सोबत 500 रुपयाचा चा स्टॅम्प दिला,
अश्या हजारो बिचाऱ्या गरीब जनतेच्या खिशावर 200 रुपयाचा अतिरिक्त भुदंड दररोज पडत आहे,
आणि 100 चा स्टॅम्प 110 ते 120 रुपया मध्ये देतात तेव्हा अतिरिक्त रशिबद्दल विचारले तर म्हणतात की सरकारने स्टॅम्प मागे अतिरिक्त लिहण्याचा बोझा आमच्या वरती लावलेला आहे त्याची ती अतिरिक्त राशी आम्ही घेतो अशी उत्तर जनतेला मिळतात
हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाल परिसर आणि तहसील कार्यालय परिसरात सुरु आहे,
म्हणून आपण हा सर्व अनैतिक व्यवहार थांबविण्यासाठी राज्यातील सर्वच ठिकाणी 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध करून द्यावेत आणि जे वेंडर अतिरिक्त पैसे घेतात त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून नवीन परवाने देण्याबाबत परिपत्रक काढावे अन्यथा आंदोलन केले जाईल अशी सूचना प्रशासणाला दिली.