
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनी संविधान चौक स्थित बाबासाहब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिवसेना चे राज्य संघटक सागर डबरासे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले आणि मानवंदना देण्यात आली ,
या प्रसंगी राज्य संघटक सागर डबरासे,उपजिल्हाप्रमुख मनोज शाहू, वाहतूक सेना के जिल्हाध्यक्ष राजेश वाघमारे, राजेश गायकवाड, कैलास मस्के, हरीश पाटील, शरद दंडाळे,गुड्डु रहांगडाले, विक्रम राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते,
यावेळी प्रदेश संघटक सागर डबरासे यांनी सांगितले की डॉ बाबासाहब आंबेडकर यांचे देशातील करोडो शोषित पीडित आणि मजलूम जनतेचे उत्थान करण्यात आणि देशाला एकजुट ठेऊन सर्वाना समान अधिकार देण्यात महत्वाची भूमिका आणि खूप मोठे योगदान आहे,
त्यांनी स्वातंत्र्य भारताला संविधानाच्या माध्यमातून लोकशाही देऊन सर्वच वर्गाच्या लोकांना न्याय देण्याचे कार्य केलेले आहे,
म्हणून सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालले तर देशाची आणि स्वतःची पण उन्नती होऊ शकते अशे प्रतिपादन केले.