दीक्षाभूमीला विजयादशमी,धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

नागपूर:म हामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र स्थानी 14 ऑक्टोंबर 1956 साली विजयादशमीच्या दिनी सकाळी 9 वाजता महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून आपल्या लाखो अनुयायासोबत विज्ञानवादी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती,
म्हणून या दिवसाला “धम्मचक्र प्रवर्तन दिन” आणि या भूमीला “दीक्षाभूमी” असे संबोधले जाते आणि या दीक्षाभूमीमुळे नागपूरचे नाव देशाविदेशाच्या पटलावर आले आहे,
म्हणून दरवर्षी विजयादशमीच्या दिनी देशा-विदेशातून लाखों अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीवर येऊन नतमस्तक होतात व स्वतःला धन्य समजतात.
यावर्षी सुद्धा देशा-विदेशातून 25 लाखाच्या जवळपास जनता दीक्षाभूमीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्याकरिता आली होती,
त्यानुसार शासनातर्फे सुख सुविधेचा अभाव दिसून आला,
दीक्षाभूमीच्या ठिकाणी जागोजागी चिखल आणि साचलेले पाणी दिसून आले त्यामुळे येथे आलेल्या जनतेला बसण्यासाठी बरोबर जागा मिळाली नाही,त्याचप्रमाणे संपूर्ण रस्त्यावर कचरा,घाण सुद्धा दिसून आली,
पिण्यासाठी पाण्याची सुद्धा व्यवस्था बरोबर करण्यात आलेली नव्हती, स्वास्थ संबंधित सुद्धा सुविधेचा अभाव होता,
ज्या पद्धतीने आलेल्या लोकसंख्येच्या आधारावर पोलीस बंदोबस्त हवा असायला पाहिजे होता तो दिसून आलेला नाही,फक्त पोलीस नियंत्रण कक्षा मधून सूचना बरोबर ऐकायला येत होत्या.
दीक्षाभूमीवर बुद्धिझम आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजण्यासाठी देशाच्या अनेक राज्यातून तसेच विदेशातून लाखो अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनी येतात परंतु भाषेच्या अभावामुळे त्यांना बरोबर बुद्धीजम आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारेची माहिती बरोबर कळत नाही म्हणून “प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती” ने या डिजिटल युगामध्ये अशी कोणतीही डिजिटल स्क्रीन किंवा सुविधा केलेली नाही अशी कुजबूज अनेक राज्यातून आलेल्या जनतेच्या मुखातून ऐकायला मिळाली,
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी “परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती” द्वारा मंचवर अनेक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बोलावल्या जात होते त्यामुळे प्रत्येक वर्षी येणारी जनता नाराज दिसत होती आणि प्रत्येकाच्या तोंडून हेच ऐकायला मिळत होतं की दिक्षाभूमीचा मंच राजकीय मंच नसून फक्तं धम्माचा मंच आहे म्हणून या मंच वरून राजकारण न होता फक्त धम्माचे कार्य आणि बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार व्हायला पाहिजे,
म्हणून यावर्षी स्मारक समितीने दखल घेऊन कोणत्याही राजकीय पक्षांच्या पुढार्यांना मंचवर न बोलावता फक्त बौद्ध धम्म गुरु यामध्ये, कुशीनगर उत्तर प्रदेशातून भिखु संघाचे अध्यक्ष ए.ए.बी.ज्ञानेश्वर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा,
दिक्षाभुमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, भंते सत्यशील,भंते ज्ञानज्योती, भंते प्रज्ञाशील, भंते संघरत्न मानके,भंते प्रियदर्शी हे मंचवर राहणार असल्याचे भंते ससाई यांनी जाहीर केले होते.