मैत्रेय बुद्ध विहार एकदरा येथे वर्षावास समापन व नवदीक्षित धम्मचारी यांचा सत्कार समारोह संपन्न….
महेंद्र हरले (वरुड)

वरुड तालुक्यातील एकदरा येथे बौद्ध परंपरेनुसार दरवर्षी वर्षावासाच्या निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात येते. त्यानिमित्ताने तीन महिने सतत कार्यक्रम आयोजित असतो. त्याचा समापनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती,नरखेड चे सदस्य,आयु.सुभाष पाटील हे उपस्थित होते.धम्मचारी करुणारत्न,काटोल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माणिकराव बागडे, सी.डी.अढाऊ सर, धम्मचारीनी मैत्रीतारा ह्या होत्या.
या कार्यक्रमाच्या औचीत्याने नवोदित धम्मचारी तेजोदीप्त (राहुल बागडे) श्रद्धादित्य(चरणजी गजभिये),कुशलसत्व ,(अरुण ब्राम्हणे ) यांचा सत्कार करण्यात आला. अतिशय कठीण परिस्थितीतून नव दीक्षित धम्मचारी यांनी मार्ग काढत धम्मजीवन जगण्याचा संकल्प केला असे मनोगतातून व्यक्त केले. चोखोबाजी बांबोडे, आमनेर शंकरराव करणासे घोराड, मनोज झोडे वाठोडा,गजानन बागडे, बेसखेडा ,भाऊराव गावंडे,ढगा पुंडलिकराव बागडे एकदरा,तुकाराम गोंडाने सावंगी ई मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.दर्शना विनोद बागडे व आभार प्रदर्शन धम्मचारीनी मैत्रीतारा यांनी केले. पूजा कल्पना गाडगे, लक्ष्मीबाई मेश्राम व गीत गायन मारोतराव धुताले, यांनी गायले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.सीमाताई बागडे, दर्शनाताई शेंडे जयवंताबाई बागडे आदींनी परिश्रम घेतले परिसरातील असंख्य जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित होता.