दिवंगत धम्मचारी कृपाकर यांचे कार्य अजरामर राहील-धम्मचारी श्रद्धा राजा( इंग्लंड )
प्रतिनिधी

वरुड (आमनेर)-दिवंगत धम्मचारी कृपाकर यांचे धम्मकार्य आमनेर या गावातून सुरू झाले. त्याचीच दखल घेऊन धमचारी श्रद्धा राजा इंग्लंड यांनी या ठिकाणी भेट दिली त्या प्रसंगी बोलताना म्हणाले की, धम्मचारी कृपाकर यांचे कार्य महान आहे.त्यांचा आदर्श घेऊन आपण कार्य धम्मकार्य केले पाहिजे. त्रिरत्नआदर्श बहुउद्देशीय संस्था, आमनेर यांनी छोट्या कार्यक्रमाचे अयोजन केले त्यात धम्मचारी श्रद्धाराजा बोलत होते. त्यांच्या समवेत धम्मचारी आदित्यबोधि पुणे यांनी त्यांच्या भाषणाचा अनुवाद केला. धम्मचारी नागमित्र ,कोलकाता यांनी त्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र विनोद बागडे यांनी तर प्रस्ताविक धम्मचारी तेजोदीप्त यांनी केले. कार्यक्रमाला माणिकराव बागडेवरूड,चोखोबाजी बांबोडे आमनेर, मनोज झोडे वाठोडा, सुखदेव घोरपडे चांदस,कल्पना पावडे एकदरा, वंजारी ताई एकदरा ,डॉ. करणासे घोराड,वसंत बागडे एकदरा,दिनेश वाळके आमनेर,वाकोडे पाटील आमनेर,स्वप्नील वानखेडे ढगा,बडोदे सर चांदस, गेडाम साहेब आमनेर,शंकरराव कर्णासे घोराड, विद्याताई बोरकर आमनेर , खंडारे परिवार आमनेर,वामनराव लोखंडे आमनेर, इ.मान्यवर आजूबाजूच्या गावातून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पूजेने झाली व कार्यक्रमाचा शेवट मैत्री गीताने झाला.