
महायुती चा सुटला पेच मतदार संघ भाजपकडे!
मोर्शी वरुड मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती त्यामुळे डॉ.मनोहर आंडे हे भाजपातुन बाहेर पडले आणि राजीनामा दिला, त्यांच्या पाठोपाठ दोन दिवसा अगोदर चंदू उर्फ उमेश यावलकर यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षातून फारकत घेतली होती परंतु BJP कोर समितीने या मतदारसंघात गंभिर दखल घेवून राजीनामा दिलेले चंदू उर्फ उमेश यावलकर यांना राज्याचे नविन अभिमन्यू म्हनून रातोरात प्रचलित झालेले देवेंद्र फडणवीस आणि बावन कुळे यांनी तातडीने बोलावून भाजप मध्ये घाईगडबडीत पुन्हा प्रवेश करुन घेतले त्यामूळे ऐन वेळी बोंडे साहेबांनी अगदी शेवटच्या क्षणी सौ अर्चनाताई मुरूमकर ला डावलुन स्वतःच बोंडे साहेब किंवा सौ. बोंडे मॅडम उमेद्वार म्हणुन लढण्याचे स्वप्नांना पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयाने स्वप्न धुळीस मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
कारण सूत्रांच्या माहिती नुसार चंदू उर्फ उमेश यावलकरांची या मतदार संघातून भाजपा ची उमेदवारी जाहीर झाल्याचे समजते….
अजित पवारांचे लाडके विद्यमान आमदार देवेंद्र भुयारांचा पोपट….
देवेंद्र भुयार यांचा अजित दादांच्या राष्ट्रवादी ने पोपट केला असुन या तरण्या ताठ्या पोपटाची ही राजकिय आत्महत्याच म्हटल्यास वावगे ठरू नये. या झालेल्या नाटकिय घडामोडीमुळे देवा भाऊंचे राजयोग संपल्यात जमा अशी जनमाणसात प्रचंड चर्चा सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे स्वतःची ताकत आणि इज्जत वाचविण्यासाठी 28 ऑक्टोंबर ला शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज भरणार असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
महाविकास आघाडीत उमेदवार कोण ?
आता खरी अग्नी परीक्षा पाहायला मिळेल ती महाविकास आघाडी ची खासदार अमरभाऊ काळे यांचे सह मामाश्री अनिलबाबू देशमुख हे विक्रम ठाकरे यांच्या साठी आग्रही असुन आपली ताकद पणाला लावत आहे पणं त्यांना ही तिकीट मिळणार नाहीच कारण 287 विधान सभेचे भविष्य मुम्बईच्या सिल्वर ओक वर ठरविले जाईल मात्र 288 विधानसभा म्हणजे मोर्शी-वरूड यासाठीचे सिल्वर ओक हे जरुडच आहे येथे ठरविल्या जाईल महाविकस आघाडीचा उमेद्वार.
डॉ.आंडे हे 25 ऑक्टोबर पर्यंत महाविकास आघाडीकडून दमदार दावेदार होते. परंतु आता जातीय समीकरण जर काढले तर ऐन वेळी वेगळा निर्णय घेतला जाऊं शकते.
श्री हर्षवर्धन देशमुख यांचा वारसा कोण सांभाळेल याचे उत्तर भविष्याच्या गर्भात जरी असले तरी वर्तमान काळात श्री गिरीश कराळे किंवा डॉ.आंडे हे भविष्यातील वारस असु शकतात परंतु वर्तमान काळात हर्षवर्धन देशमुख यांचे वर मोर्शी-वरूड मतदार संघातील युवा कार्यकर्ते आणि प्रचंड जनसामान्यांचा वाढता आग्रह आणि प्रतिसाद पाहता ऐन वेळी हर्षवर्धन देशमुखानीच उमेद्वारी दाखल केली तर वावगे ठरनार नये.
त्यामूळे पुढील 48 तासात काय घडामोडी होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल मोर्शी मतदार संघातील मतदारांचे सिल्वर ओक कोणाला उमेद्वारी देतात की मतदार संघातील जनसमुदाय हर्षवर्धन देशमुख यांनाच उमेद्वारी घोषित करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल…