
अविनाश ठाकरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीक म्हणून पाहिले जाते,
अविनाश ठाकरे हे भाजपाचे सक्रिय आणि प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे,
म्हणून भाजपाने त्यांना महानगरपालिकात स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच सत्ता पक्ष नेतेपदाचा सुद्धा मान दिलेला आहे,
अविनाश ठाकरे यांनी काटोल मतदार संघातून 2019 तसेच 2024 च्या विधानसभेतुन निवडणूक लढण्याची तयारी सुद्धा केलेली होती आणि पक्षाने सुद्धा हिरवी झेंडी दिली होती, त्याच अनुषंगानेच ते कामाला सुद्धा लागलेले होते,
यादरम्यान त्यांनी संपूर्ण काटोल नरखेड विधानसभाक्षेत्र पिंजून काढून आपला जनसंपर्क वाढविला होता,
परंतु पक्षाने ऐनवेळी काटोल मतदार संघातून चरणसिंग ठाकूर यांची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे अविनाश ठाकरे 2024 च्या निवडणुकीत पुन्हा हुकले,
त्यामुळे त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी व त्यांच्या जनसंपर्काचा फायदा पक्षाला होण्यासाठी भाजपाने ठाकरेंना त्याच काटोल-नरखेड मतदार संघाचे निवडणूक प्रभारी म्हणून त्यांची नियुक्त केली आहे,
यामुळेच अविनाश ठाकरेंच्या मतदारसंघातील जनसंपर्कामुळे पक्षाला नक्कीच फायदा होईल अशी काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.