
नागपूर:उत्तर नागपूर विधानसभा (Schedule Cast) अनुसूचित जाती करिता आरक्षित आहे, त्याचबरोबर या विधानसभा क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती ज्यामध्ये विशेषता बौद्धांची संख्या ही 1 लाख 80 हजाराच्या जवळपास आहे त्यामुळे या विधानसभेमधून एकदाच भाजपाचे भोला बडेल निवडून आले,
त्यानंतर सतत बौद्ध समाजाचाच उमेदवारच या विधानसभेमधून निवडून आलेला आहे,
कधीकाळी हा मतदार संघ रिपब्लिकन पक्षाचा गड मानला जात होता ज्यामध्ये खोरीपाचे सूर्यकांत डोंगरे हे दहा वर्ष तर उपेंद्र शेंडे हे पाच वर्ष आमदार म्हणून या क्षेत्रातून निवडून आलेले आहेत,
त्यानंतर नितीन राऊत हे चार वेळा म्हणजेच वीस वर्ष याच मतदारसंघातून विजयी झालेले आहेत याच दरम्यान मध्यंतरी 2014 च्या निवडणुकीत डॉ. मिलिंद माने यांनी सुद्धा पाच वर्ष या मतदारसंघाचे भाजपा तर्फे प्रतिनिधित्व केलेले आहे,
त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीमध्ये बसपा ने सुद्धा मतांची मोठी टक्केवारी याच मतदारसंघातून गाठलेली आहे, या विधानसभा क्षेत्रामधून नागपूर महानगरपालिकेत बसपाचे अनेक नगरसेवक निवडून येतात, म्हणून हा बसपाचा कॅडर बेस मतदारसंघ म्हणून पहावयास मिळतो,
राजेश तांबे किशोर गजभिये, सुरेश साखरे यांनी विधानसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर चांगले मतदान घेऊन आपली पकड मजबूत केलेली होती,
परंतु राजेश तांबे, किशोर गजभिये आणि सुरेश साखरे यांनी बसपाला राम राम ठोकून ते दुसऱ्या पक्षात गेले असल्यामुळे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवीन उमेदवाराची चाचपणी बसपा तर्फे रविवारी 20 ऑक्टोबरला वर्धा येथील हॉटेल विद्यादीप रीजन्सी मध्ये मुलाखतीच्या रूपाने करण्यात आली,
त्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे यांनी आपल्या सहकार्यांसोबत वर्धेला येऊन बसपाच्या उमेदवारी करिता अर्ज करून बसपाचे प्रदेश प्रभारी इंजी.रामजी गौतम,प्रदेश प्रभारी मा.नर्मदाप्रसाद अहिरवार,प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव पृथ्वीराज शेंडे, झोन इन्चार्ज मोहन राईकवार यांच्या समोर मुलाखत सुद्धा दिलेली आहे,
- मनोज सांगोळे हे जर उत्तर नागपूर विधानसभा मध्ये बसपाचे उमेदवार म्हणून राहिलेत तर नितीन राऊत यांना ते चांगलीच टक्कर देऊ शकतात कारण त्यांना काँग्रेस मधीलच काही नगरसेवक आणि बरेच पदाधिकारी मदत करू शकतात त्यामुळे ही निवडणूक त्रिकोणी होण्याची शक्यता टाळता येत नाही, सोबतच मनोज सांगोळे हे 5 टर्म चे नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा असून ते 24 तास तत्परतेने जनतेच्या सेवेकरता हजर असतात म्हणून त्यांची ओळख “लोकसेवक” या नावाने आहे, त्याचाच फायदा मनोज संगोळे यांना मताच्या रूपाने होऊ शकते.
परंतु अशे असले तरी शेवटी या क्षेत्राची बसपाची उमेदवारी नक्कीच कुणाला जाईल हे अद्यापही सांगता येणार नाही, त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल…..