
शेंदुरजना घाट मलकापूर:आम्ही भारताचे लोक अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शेंदूरजना घाट मलकापूर च्या वतीने तिसरी क्रमांकाची दीक्षाभूमी शे . घाट मलकापूर या ठिकाणी 207 वा भीमा कोरेगाव शौर्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम येना डॉ आलेले भिखू संघाच्या वतीने वंदना घेण्यात आली नंतर राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले आणि समता सैनिक दलच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाकरिता प्रकल्प अधिकारी विलास आठवले समता सैनिक दल प्रमुख देवरत नागले गौतम गजभिये भारतीय बौद्ध महासभा शे.घाट अध्यक्ष मंगेश बागडे, रमेश कुसळे, भास्कर सहारे, रणदीप दवंडे, सुशील बागडे, उमेश घोरपडे, चंदू ढोके, अरविंद दवंडे, दीपक दवंडे, शरद झोड, गौतम बागडे, गोकुल दुपारे, मयूर बागडे, सुनील दुपारे, मोतीराम बागडे, पंकज मसाने आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल पाटील यांनी केले.
1818 शौर्य दिनानिमित्त थोडक्यात माहिती विलास आठवले यांनी सांगितले आणि या कार्यक्रमाचे आभार रणदीप दवंडे यांनी केले.