
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत अनिल देशमुख जखमी झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नरखेड येथील सांगता सभा आटपुन अनिल देशमुख तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला.यात अनिल देशमुख यांच्या चार चाकी वाहनाचा समोरचा काच फुटला आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाल्याचे बोलले जात आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भाजपच्या गोटातून यावर प्रतिक्रिया आली आहे.
ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.
या तीव्र घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काटोल पोलीस स्टेशनचा घेराव करून नारेबाजी करीत असल्याचा विडिओ समोर येत आहे.