
वरुड :महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती,वरुड तर्फे ६ मार्च रोजी भारतभर सुरु असलेल्या महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन मोर्चाचा एक भाग म्हणुन आंबेडकराईट वेलफेअर असोसिएशन व्दारे सर्व सामाजिक संघटनांना एकत्रित करून पूज्जनिय भदंत डॉ सत्यानंद महास्थविर यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालय वरूड द्वारा महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन दिले,
निवेदनात सांगितले की १९४९ चा कायदा रद्द करून हे बुद्ध विहार बौधांच्या स्वाधीन करावं असे निवेदन देण्यात आले या मोर्चा नेतृत्व भदंत डॉ सत्यानंद महस्थविर यांनी करून आपली भूमिका मांडली तसेच , प्रा. आनंद तायडे (आंबेडकराईट वेलफेअर असोसिएशन),प्रा. वसंत वावरे (आंबेडकराईट वेलफेअर असोसिएशन) अरविंदजी गजभिये भारतीय बौद्ध महासभा तालुका वरूड (से. नि भारतीय सैनिक) यांनी महाबोधी बुद्ध विहार संदर्भात आपली भूमिका मांडली
या मोर्चा मधे नागसेन बुद्ध विहार वरूड, भारतीय बौद्ध महासभा वरूड तालुका,प्रज्ञा बुद्ध विहार मोर्शी, करुणा बुद्ध विहार वरूड चे पदाधिकारी आणि सर्व गावातून आलेले उपासक उपासिका संघ प्रामुख्याने उपस्थित होते.