अर्थकारण

निवडणूकीत डीपॉजिट जप्त म्हणजे काय? डिपॉजिट वाचविण्यासाठी लागतात इतकी मते…..

प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांकडून आम्ही त्याचं डिपॉझिट जप्त करून अशी गर्जना केली जाते. डिपॉझिट जप्त म्हणजे नामुष्कीजनक पराभवच; कारण वैध मतांच्या एकषष्ठांशही मते जे उमेदवार मिळवू शकत नाहीत, त्यांचे डिपॉझिट रक्कम जप्त होते. राज्यात यंदा किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.


लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर अनेकजण अपक्ष अर्ज भरतात. काहीजण कोणत्याही पक्षात नसतानाही निवडणूक लढवत असतात. काहीजण प्रत्येक निवडणूक लढवतातच तर काही नवखेही उभे राहतात. सर्वसाधारण गटातील उमेदवारांना १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये डिपॉझिट रक्कम उमेदवारी अर्ज दाखल करताना जमा करावी लागते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एकषष्ठांशापेक्षा कमी मते मिळाल्यास डिपॉझिट रक्कम जप्त होणार आहे. डिपॉझिट रक्कम परत करताना एकूण वैध मतांची गणना करताना ‘नोटा’ला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत.

या’ उमेदवारांना मिळणार डिपॉझिट रक्कम परत

उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध असल्यास किंवा नाकारले गेल्यास अनामत रक्कम परत मिळते. उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी मागे घेतली तरीसुद्धा अनामत रक्कम परत केली जाते. निवडून आलेल्या उमेदवारालाही अनामत रक्कम परत मिळते. मतदानाच्या प्रारंभापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस अनामत रक्कम परत केली जाते,

ही बातमी वाचा.  Quinoa new recipes, feta & broad bean salad

डिपॉझिट रक्कम परत करताना एकूण वैध मतांची गणना करताना ‘नोटा’ला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.