ताज्या घडामोडी

सलील देशमुखांच्या जोरदार प्रचाराने विरोधकांना फोडला घाम…

काटोल प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

काटोल मतदारसंघ हा अनिल देशमुखांचा गढ मानला जातो,
2014 च्या विधानसभा निवडणूकीत मोदी लाट मध्ये फक्त त्यांचा पराभव भाजपाच्या तिकीटवर आशिष देशमुखानी केला होता,


2024 च्या विधानसभा निवडनुकीत महाविकास आघाडी प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनिल देशमुखांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सलील अनिल देशमुख हे निवडणूक लढत आहेत,
सलील देशमुख हे युवा असून सुशिक्षित आहेत व सरळ स्वभावाचे व्यति आहेत ते सध्या जिल्हापरिषद सदस्य आहेत त्यामुळे त्यांचा सुद्धा जनसंपर्क दांडगा आहे,


काटोल विधानसभा मतदारसंघात काटोल आणि नरखेड अश्या दोन तालुका येतात,
या दोन्ही तालुक्यात बाप लेकानी प्रचाराची धुरा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे, त्यामुळे सलील देशमुखांच्या प्रचारात कुठेही कमी पडताना दिसत नाही,आणि असल्या जबरदस्त प्रचारामुळे त्यांचा जनतेशी डायरेक्ट संपर्क होत आहे,

काटोल विधानसभेतील दोन्ही तालुक्यात कुणबी समाज मोठया प्रमानात आहेत त्यांची परंपरागत मते ही काँग्रेस राष्ट्रवादीलाच जातात,
त्यांनतर माळी, तेली आणि बुद्धिस्ट समाज व मुस्लिम समाज आणि काही प्रमाणात अन्य समाजाची मते सुद्धा आहेत,यापैकी बुद्धिस्ट आणि मुस्लिम समाज सुद्धा अनिल देशमुखांच्या कार्यशैलीला पसंद करतो म्हणून त्यांची मते सुद्धा सलील देशमुखांना पडतील यामध्ये कोणतीही शंका वाटत नाही,

याशिवाय चरणसिंग ठाकूर हे भाजपच्या कमळावर तर दुसरे अपक्ष आणि काँग्रेस चे बंडखोर उमेदवार जिचकार तर तिसरे शेकाप चे राहुल देशमुख सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत यांची सुद्धा या विधानसभा क्षेत्रामध्ये थोडीफार पकड असल्यामुळे मतांचे विभाजन होऊ शकते,

ही बातमी वाचा.  '‘हिंदूंचा गब्बर’ वगैरे म्हणवून घेणारे..', उद्धव ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात 'वंदे मातरम्'चा सौदा'

दर्शन एक्सप्रेस न्युज च्या प्रतिनिधीने या मतदारसंघात जनतेचा कौल घेतला असता भाजपा आणि राष्ट्रवादी मध्ये जोरदार टक्कर असुन त्यामध्ये सलील अनिल देशमुख यांचे पारडे भारी दिसत आहे म्हणजे एकंदरीतच सलिल देशमुखांचा  विजय निश्चित मानला जात आहे.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.